तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा.एखादी वस्तू जुनी झाली की ती टाकून देऊन नवीन वस्तू विकत घेणे हीच आजची रित बनली आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राने एवढ्या वेगाने प्रगती केली आहे की, अद्ययावत गॅजेटचा आयुष्यकालही काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. 2007 मध्ये अॅपलने त्यांचा सर्वात पहिला आयफोन बाजारात आणला होता, पण आजच्या काळात तो पूर्णत: कूचकामी ठरला असून ग्राहकांच्या विस्मृतीतही गेला आहे. पहिल्या आयफोननंतर अॅपलने त्यांच्या तीन सुधारित आवृत्त्या बाजारात आणल्या. सध्या आयफोन-4 ची चलती आहे. सर्वात पहिला अॅन्ड्रॉईड फोन जी-१ बाजारात आल्यानंतर 2 वर्षे पूर्ण व्हायच्या आतच जुनाट वाटू लागला.या पार्श्वभूमीवर विंडोजची एक्सपी ही ऑपरेटिंग सिस्टिम दशकभर वापरली जात आहे. मायक्रोसॉफ्टने एक्सपीच्या आधी ‘विंडोज-मी’ ही ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली होती; परंतु ती अयशस्वी ठरली. त्यानंतर आलेली एक्सपी आजही वापरली जात असून नुकत्याच आलेल्या विंडोज व्हिस्टा आणि विंडोज-7 या ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षाही लोकप्रिय आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते मायक्रोसॉफ्टने एक्सपीमध्ये पहिली पाच वर्षे कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे एक्सपीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आणि लोकप्रियता वाढली. यातच एक्सपीच्या यशाचे गुपित दडले आहे. एक्सपी वापरणार्यांना ही ऑपरेटिंग सिस्टिम विशेष आवडण्याचे कारण म्हणजे ती वापरताना फारशा समस्या येत नाहीत, तिला व्हिस्टा आणि विंडोज-7 या ऑपर
टिंग सिस्टिम्सच्या मानाने अतिशय कमी मेमरी लागते. तसेच हार्डडिस्कवरील जागा आणि प्रोसेसर स्पिडही कमी लागतो. सगळ्यात महत्त्वाची
बाब म्हणजे विंडोज एक्सपी जगातील सर्वप्रकारच्या हार्डवेअरमध्ये वापरता येते. नेट बूक्सच्या आगमनानंतर 2007 मध्ये
एक्सपीमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतरही एक्सपीची लोकप्रियता वादातीतच राहिली.
— महेश धर्माधिकारी
Leave a Reply