दोन सीमांवरचे,
दोन्हीही वैरी, झाडती फैरी,
तरी आपण गप्प बसावे काय?
गप्प बसण्याव्यतिरिक्त,
आपण दुसरे काय करणार आहोत की नाय?
किती दिवस लोकशाहीचे स्तोम माजवावे?
ह्याला काय कालगणना आहे की नाय?
षंढत्वाची धरुनी कास,
नकर्तेपणाची धरुनी आस,
मुत्सद्देगिरीची भाषा येथे कामाची नाही,
तोपर्यंत आपल्या जनतेची झाली त्राहि त्राहि,
एकाचा खून केला,
दुसर्याने सीमोलंघन केले,
तरी समोपचाराची भाषा वापरावी काय?
हे कलियुग आहे,
येथे गांधीगिरी चालणार नाय.
येथे हवी शिवबांची कठोरता,
येथे हवी सुभाष चंद्रांची नितीमत्ता,
येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,
येथे हवी भगतसिंघांची चपलता,
तरच आपला निभाव लागणार हाय,
तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!
…………………………………….मयुर तोंडवळकर.
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Leave a Reply