साहित्य:
२ कप आंबट ताक
तांदळाचे पीठ
३-४ लसणाच्या पाकळ्या
१ छोटा आल्याचा तुकडा
३-४ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी:
१/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून हळद
३-४ कढिपत्त्याची पाने
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीनुसार
सजावटीकरता कोथिंबीर
कृती:
एका कढईमध्ये तेल गरम करावे. तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी द्यावी. त्यात लसूण व आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले की त्यात ताक घालावे. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहावे ज्यामुळे ताक फुटणार नाही. ताकाला उकळी आली की त्यात चवीपुरते मीठ घालावे. तांदळाचे पीठ वरुन भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण भराभर पिठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा घट्टपणा हवा असेल तेवढे तांदळाचे पीठ हळूहळू घालत ढवळत राहावे. वाफ काढावी. अशा पद्धतीने गरमागरम ताकातली उकड तयार. त्यावर कोथिंबीरीने सजावट करुन सर्व्ह करावी.
—
Leave a Reply