पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. पहिल्या पिढीला दुसर्या पिढीकडून अपेक्षा होत्या आणि दुसर्या पिढीला तिसर्या पिढीकडून अपेक्षा आहेत. पण पहिल्या पिढीला तिसर्या पिढीकडून काहीच अपेक्षा नसतात त्यामुळे पहिली पिढी तिसर्या पिढीला घडविण्याच्या दुसर्या पिढीच्या कार्यात मदत कमी आणि अडचणीच अधिक निर्माण करते. या सगळ्यात दुसर्या पिढीचीच गळ्चेपी होते. ज्यामुळे दुसरी पिढी पहिल्या पिढीपासून दुरावते आणि तिसरी पिढी पहिल्या पिढीपासून.
त्यामुळे आता पहिल्या पिढीने काही गोष्टींचा जाणिवपुर्वक विचार करायला हंवा. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे सपूर्ण जग आता घडयाळाच्या काट्यावर आणि संगणकाच्या क्लिकवर चालतय. या सार्याचा भयान अनुभव दुसर्या पिढीने घेतला आहे घेत आहे. त्यामुळे या सर्वांना सामोर जाण्यास तिसर्या पिढीला सज्ज करण्याची जबाबदारी दुसरया पिढीवर आहे. पहिल्या पिढीला ही जबाबदारी आता झेपणारही नाही. पहिली पिढी या सर्वापासून लांब राहिल्यामुळे त्याची झळ त्यांना पोहचलेली नाही. तिसर्या पिढीला उत्तम घडविणे हे आता दुसरया पिढीसमोरील सर्वात मोठ आव्हान आहे. पहिल्या पिढीला तिसर्या पिढीसोबत आपला वेळ आनंदात घालविण्याखेरीज दुसरा उद्योग नसतो. त्यामुळे पहिल्या पिढी कडून तिसर्या पिढीवर चांगले संस्कार होणे बाजूलाच राहते पण कधी – कधी तिसरी पिढी अधिक उद्दट, लाडावलेली आणि हळ्वी होण्यास कारणीभूत ठरते. दुसर्या पिढीच्या मनात पहिल्या पिढीबद्दल आदर आसल्यामुळे याबतीत दुसरी पिढी मनात असतानाही काही बोलू शकत नाही. पण आपली होणारी घुसमट थांबविण्यासाठी दुसरी पिढी दोघांनपैकी एका पिढीला आपल्यापासून दूर लोटते ज्याचे होणारे संभाव्य परिणाम आज समाजात दिसता आहेत. निसर्गनियमाप्रमाणे आज पहिली पढीची जबाबदारी दुसर्या पिढीवर आहे आणि तिसर्या पिढीला जबाबदारही दुसरी पिढी आहे त्यामुळे दुसर्या पिढीवर दुहेरी जबाबदारी असते. पण दुसर्या पिढीची व्यथा कोणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.
पहिल्या पिढीला नेहमीच वाटत राहत दुसरी पिढी आपल्यावर अन्याय करतेय आणि तिसर्या पिढीला वाटत राहत दुसर्या पिढीपेक्षा पहिली पिढी अधिक प्रेमळ आणि चांगली होती पण तिसर्या पिढीला हे कधी कळ्त नाही आपल भविष्य उज्वळ करण्यासाठी आपल्याला दुसर्या पिढीचच ऐकावं लागणार. पहिल्या पिढीने आपल मन तिसर्या पिढीत न गुंतवता स्वतःत गुंतवल तर त्याचा त्यांना आणि समाजालाही उपयोगच होईल. पहिल्या पिढीने दुसर्या पिढीच्या तिसर्या पिढीला घडविण्याच्या कार्यात अडचण न होता दुसर्या पिढीला त्या कार्यात मदत केली तर तिसर्या पिढीपासून पहिली पिढी दुरावणार नाही आणि तिन्ही पिढ्या गुण्या- गोविंदाने एकत्र नांदताना दिसतील…
— निलेश बामणे
Leave a Reply