नवीन लेखन...

तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे

चांगले कसे जगावे हे शिकविणारी तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे:

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे ज्ञानाचे-शहाणपणाचे भांडार निवडक अभंगाचे विषयानुसार वर्गीकरण/संकलन केले आहे. डॉ. यादव अढाऊ यांनी. आजच्या घाईगर्दीच्या जीवनात कोणालाही याचा सहज लाभ घेऊन आपले जीवन यशस्वी करता येईल.
पृ. 80
किं. 75 रू.
ISBN: 978-93-80232-39-3

डॉ. यादव अढाऊ यांनी लिहिलेले “तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे” हे पुस्तक वाचले. त्यांनी तुकाराम महाराजांनी जे विपूल अभंग वाङमय लिहिलेले आहे. ते म्हणजे एक मोठा महासागर आहे. अशा अमूल्य महासागरातून त्यांनी 730 मोती शोधून काढले. ते मोती काढतांना त्यांना किती त्रास झाला असेल, ह्याची कल्पना न केलेली बरी.

त्यातील 64 विषयात हे 730 मोती कुठे कुठे खुलून दिसतील अशा पद्धतीने त्यांना कोंदणात बसवितांना अर्थपूर्णता आणली आहे. काही आवडीचे विषय आहेत. ज्यावर तुकाराम महाराजांनी जास्त लक्ष दिले आहे. ते त्या विषया संदर्भात मांडले आहे उदा. अनुभवहीन 56, आचरण 42, भक्ती 46 सत्‌संग समर्थ, सत्य, स्वहित, स्वभावधर्म, सज्जन, शुद्ध चित्त, विवेक/अविवेक, मन, भोंदू अभक्त ढोंग, भान अशा विषयांवर 20 ते 30 च्या दरम्यान जीवनसूत्रे उद्‌धृत केली आहे. काही 1, 2, 5, 10 अशी आहे. सर्वच अर्थपूर्ण आहेत कारण ती त्या विषयांशी संबधित आहेत.विषयांची मांडणी अ ते ज्ञ ह्या बाराखडीत आहे. काही कठीण शब्दार्थ शेवटी मुद्दाम दिलेला आहे. मुखपृष्ठ पुस्तकाचे चार रंगी असून अत्यंत आकर्षक आहे.तुकाराम महाराजांनीच लिहिलेले अभंग असल्यामुळे ते सर्व उत्तमच आहेत परंतु एवढ्या मोठ्या वाङमयातून वेचून पद्धतशीर मांडणी करणे आणि वाचकाला तयार मसाला देऊन त्यांनी तुकाराम महाराजांच्या वाङमयाकडे डोळस दृष्टीने पहावे ह्यासाठी हा प्रपंच केला असावा, असे वाटते.तुकाराम महाराजांनी समाजातील लोकांनी कसे वागावे, त्यांच्या त्रुटी काय हे ह्या अभंगाद्वारे त्यांचा सुजाण करण्यासाठी सांगितले आहे. ते निस्वार्थी, निस्पृही होते. त्याचे जीवन चरित्र वाचण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांनी पाठविलेली संपत्ती परत केली तर डोहांत बुडविलेले अभंग जलाचा स्पर्श न होता कोरडे परत मिळविले, ते भक्तीच्या ताकतीवर. कीर्तनाद्वारे आपले विचार त्यांनी सामान्य जनांसमोर मांडले. भक्तीमार्गाकडे लोकांची दृष्टी वळविली. त्यांचे प्रत्येक जीवनसूत्र त्यावर कोणत्याही सामान्य माणसावर प्रभाव टाकेल असे आहे, असे महत्वाचे 64 विषय लेखकाने मांडले आहे.ही जीवनसुत्रे तुकाराम गाथेतील 5000 अभंगातील अभंगत्व सिद्ध करण्यात समर्थ आहे, असे वाटते.आधुनिक व तरुण वाचकांना संत वाङमयाकडे हळूच व सहज वळविण्यासाठी नचिकेत प्रकाशनाने हा आटोपशीर पुस्तिकांची मालिका सुरू केली आहे ती अत्यंत अभिनंदनीय आहे. याच धर्तीवर समर्थसूत्रे, चाणक्य सूत्रे, विदुर नीती, शुक्र नीती आदी पुस्तिका नचिकेत प्रकाशनाने या आधी प्रसिद्ध केल्या आहेत. अशा या सर्वांगसुंदर पुस्तकांसाठी लेखक -प्रकाशक दोघांचेही अभिनंदन!

तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : डॉ. यादव अढाऊ
पाने : 80
किंमत : 75 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..