|| हरी ॐ ||
रोज वाढणारे सर्वच प्रकारचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात आलेले अपयश कुठल्या ना कुठल्या नवीन रोगजंतूचा प्रादुर्भाव सर्वत्र होऊन दररोज एक नवीनच आव्हान डॉक्टर आणि शंशोधकांसमोर उभे ठाकल्याच्या बातम्या वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सवरून आपल्या वाचण्यात आणि बघण्यात येतात. तसेच असाध्य अनुवंशिक आजार आणि अपघात यातून अचानक समोर उभ्या राहिलेल्या समस्येवर मात करण्यास वेळ लागतो आणि यात पैसा, शारीरिक आणि मानसिक त्रास आणि कटकटीना सामोरे जावे लागते आणि मग आठवते आपण आधी काही तरी करावयास पाहिजे होते. अश्याच काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला बरेच वेळा दैनिक ‘प्रत्यक’च्या हरहुन्नरी लेखिका कल्पना नाईक यांच्या घरकुल सदरातून मिळत असतात. आज अश्याच दैनदिन जीवनातील अत्यंत उपयुक्त विषयाची माहिती सहज सोप्या भाषेत त्यांनी सर्व वाचकांना करून दिली आहे.
दिनांक ७ ऑक्टोबर २०१३ च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील घरकुल सदरातील ‘थँक यू आई बाबा’ ही कल्पना नाईक यांची कथा वाचण्यात आली. कथा नेहमीच्या स्टाईलने लिहिलेली आणि नेहमीसारखीच उपुक्त माहितीच्या खजिन्याने भरलेली अशी असून मनात नक्कीच घरकूलासारखी घर करून राहते. प्रत्येक कथा किंवा लेख लिहिताना दैनिक ‘प्रत्यक्ष’चा प्रगल्भ वाचक वर्ग, तसेच स्त्री/पुरुष, त्यांची वये, आवड आणि सद्य परिस्थीची जाणीव लक्षात ठेऊन कथा किंवा लेख लिहिले जातात. तसेच सामाजिक भान व समाजाचे आपण काही देणे लागतो या सोज्वळ अश्या आपुलकीच्या भावनेतून त्या आपल्या कथा लिहित असतात असे अनेक कथांतून निदर्शनास आले आहे. प्रत्येक लेख किंवा कथा लिहिण्यापूर्वी त्या विषयाचा सखोल अभ्यासही असल्याचे कथा/लेख वाचताना जाणवते, अर्थात त्या मागे सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्मिक संस्कार दिसून येतात.
महिलेच्या प्रसूतीपूर्वीच स्टेम सेलस कलेक्शनचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करावी लागते. यासाठीचे कलेक्शन कुठल्या कंपनीमार्फत करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. या क्षेत्रात लाईफ सेल, रिलायन्स लाईफ सायन्सेस, स्टेम वन आदी कंपन्या कार्यरत आहेत. कंपनी निश्चित झाल्यानंतर त्या कंपनीचे किट प्रसूतीपूर्वी त्या त्या रुग्णालयात पोहचविणे आवश्य आहे. प्रसूतीनंतर लगेचच कलेक्शन करून ४८ तासांच्या आत त्या त्या कंपनीच्या स्टेम सेल बँक असलेल्या ठिकाणी पाठवले जाते. या बँका पुणे, मुंबई, चेन्नई या महानगरांमध्ये आहेत.
पालक व मुलांमध्ये बहुतांश जनुके सारखीच असतात. त्यामुळे सुमारे दहा टक्के स्टेम सेल्स पालकांसारखी असतात. मात्र, भावंडांमध्ये त्याची टक्केवारी ३०-४० टक्के अशी असते. जिनोमिक्सद्वारेही स्टेम सेल्सचे संकलन करणे शक्य असते. ऑटोलॉगस स्टेम सेल माकेर्टची निमिर्ती हे स्टेमेडचे मुख्य लक्ष्य आहे. ज्यात पेशंट त्याचे स्वत:चे स्टेम सेल्स वापरून त्याच्यावर उपचार करून घेऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक पेशंटचा डेटाबेस तयार करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. ऑटोलॉगस सेल्स या बहुपयोगी असतात. त्यातून ऊती तयार होऊ शकतात, जसे की नवजात अर्भकाच्या नाळेपासून मिळालेल्या स्टेम सेल्सचा रक्तपेशींच्या आजारावरील उपचारांसाठी वापर होऊ शकतो. स्टेम सेल्स या अशा मूळ पेशी आहेत ज्यापासून शरीराच्या दोनशे प्रकारच्या पेशी तयार होऊ शकतात. त्यांना मदर सेल्स असेही म्हटले जाते. पेशीच नव्हे तर शरीराचे अवयवदेखील तयार होऊ शकतात. विविध आजारांसाठी स्टेम सेल्सचा उपयोग होत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल.
येणाऱ्या काळात स्टेम सेल्सचा उपयोग करून मानव-प्राण्याच्या आयुष्याची लांबी व निरोगीपणाची रूंदी नक्कीच वाढवता येईल. परंतु “रोगापेक्षा ईलाज भयंकर” अशी अवस्था होऊनये यासाठी अशा उपचाराचे “साईड इफेक्टस’ काहि होतात का याचा विचार आत्तापासूनच करावा लागेल.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply