नवीन लेखन...

थायरॉइड

थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जिचं काम असतं थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करणं. मेंदू, हृदयाचे स्नायू तसंच शरीरातल्या इतर स्नायूंच्या कार्य नीट होण्यास तसंच शरीराला ऊर्जेच्या सुयोग्य वापर करण्यास मदत करणं यासाठी हार्मोन्स कारणीभूत असतात. थायरॉइडमध्ये बिघाड झाल्यास त्याला हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम असं संबोधतात. हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढय़ा थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करण्यास थायरॉइड ग्रंथी अपयशी ठरते. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांमध्ये जास्त शारीरिक हालचाल न करणं, अयोग्य जीवनशैली, आनुवंशिकता यांसारख्या साध्या कारणांपासून रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आजार, शस्त्रक्रिया करून थायरॉइड ग्रंथी काढणं आणि रेडिएशन घेतलं असणं अशी गंभीर कारणं ही चालतात. याची लक्षणं म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे, वारंवार सर्दी होणं, त्वचा कोरडी पडणं, उत्साह न जाणवणं, बद्धकोष्ठता, वजनात सतत चढउतार होणं. बरेचदा हायपोथायरॉइडच्या रुग्णांचं वजन वाढतच जातं. जीवनशैलीत सुयोग्य बदल घडवून आणल्यास वजन नियंत्रणात ठेवणंही शक्य होतं.
या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा महत्त्वाचा घटक ठरतो. केक, पेस्ट्रीज, कुकीजसारखे वजन वाढवणारे पदार्थ खाणं टाळावं. स्वयंपाकातला तेलाचा वापर कमी करावा. म्हणजेच तळलेले पदार्थ खाणं टाळलं. त्याचप्रमाणे साखरेच्या प्रमाणावरही लक्ष ठेवावं. आयोडिनसारख्या खनिजाच्या कमतरतेमुळेही हायपोथायरॉइडिझम उद्भवू शकतो. थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी थायरॉइड ग्रंथींना आयोडिनचीही थोडीफार गरज असते. आयोडिन उपलब्ध न झाल्यास किंवा ते कमी प्रमाणात मिळाल्यास थायरॉइड हार्मोन्सच्या निर्मितीचा वेग मंदावतो आणि त्यामुळे हायपोथायरॉइड हा विकार होतो. आहारात आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गाईच्या दुधाचा समावेश करावा. त्यामुळे आयोडिनची योग्य पातळी राखली जाईल.
निसर्गत उपस्थित राहणाऱ्या घटकाचं काही अन्नपदार्थामधलं अस्तित्व. त्यामुळे गॉइटरसारखी गंभीर समस्या उद्भवू शकते, ज्यात थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढतो. त्यामुळे सोयाबीन, सॉय उत्पादनं, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, टíनप्स, पीच, शेंगदाणे, मुळा हे गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ शिजवल्याने त्यातले घटक निकामी होतात, कारण ते उष्णता संवेदनशील असतात. परंतु हे पदार्थ केव्हा तरी आणि शिजवलेल्या स्थितीत खाणंच योग्य. नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या सूपच्या आणि रसाच्या स्वरूपात खाव्यात. टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री ही पिवळी- फळं खावीत. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा, अळशी, तीळासारख्या तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं लो-फॅट दूध / गाईचं दूध, ताक, दही आदींच्या सेवनाने आपण निरोगी राहतो. हायपोथायरॉइडिझमवर कोणताच उतारा नाही. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्याची सर्व लक्षणं कायम तुमच्यासोबत राहतील. योग्य आहार, योगसाधना, बूट कॅम्प, अॅयरोबिक्स, चालणं यासारखे व्यायाम आदींमुळे संपूर्ण शरीराला गती मिळते. या विकाराची लक्षणं कमी करता येतात आणि तुमच्यात खूप सकारात्मक बदल घडून येतील. जोडीला वजन कमी होईल, ते वेगळंच!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..