दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही.
या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.
नुकतीच या झाडांना पालवी फुटून, हि कोवळी पाने तयार झाली आहेत, या पानांचे काम खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. हि पाने या झाडांसाठी अन्न बनविण्याचे एक प्रमुख काम करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता, या पुढे झाडाची पाने कृपया सोने म्हणून वाटू नका.
लोकांना भेटायला जाऊन हात जोडून नमस्कार करा, व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या, कारण बीज तयार होणार नसेल तर फुलाचा झाडाला काही उपयोग होत नाही. जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, चाफा वगैरे पुष्कळ सुवासिक फुले बाजारात उपलब्ध असतात.
याची आणखी एक बाजू सांगतो, हि पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत. म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी निघून जातात. अश्या तर्हेने बाजारात कचरा होण्यास आपणच कारणीभूत होतो. नगरपालिकेचे लोक कचरा साफ करत नाहीत म्हणून आपण ओरडतो, मुळात कचरा केलाच नाही, तर साफ करण्याचा विषय तयार होणार नाही, याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.
प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ. मी मागील काही वर्षापासून सोने म्हणून पाने देणे घेणे बंद केले आहे.
सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— विजय लिमये
(9326040204)
Leave a Reply