मध्यपुर्वेत युवकांना इजिप्तमधील मुस्लीम ब्रदरहूड, पॅलेस्टाईनमधील हमास व लेबेनानमधील हिजबुल्ला या जहाल संघटनांचे प्रचंड आकर्षण आहे. या संघटना अनेक सामाजिक कार्य करतात. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी परिक्षेची तयारी करून घेण्यासाठी कोचिंग क्लासेस, गरिबांना रोजगार, झोपडपपट्ट्यांमध्ये वैद्यकिय सेवा, शेजाऱ्यांतील भांडणे मिटवण्यासाठी न्यायरचना या गोष्टी या संघटना पुरवितात. वास्तविक
या गरजा पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पण सरकारला शहरी, मध्यमवर्गीय, परकीय हितसंबध, मोठे उद्योगपती यांची फिकीर आहे. गरिबांकडे लक्ष देण्यात त्यांना फारसा रस नाही. त्याशिवाय सर्व अरब राष्ट्रांत लोकशाही नाही. विरोधी पक्ष नाही. त्यामुळे पिडीत लोकांना मशिदीशिवाय आसरा नाही. याचा फायदा अल कायदासारख्या संघटना घेतात.
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर,प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे२०१०.
मध्यपुर्वेतील बऱ्याचश्या राष्ट्रांत लोकशाही व्यवस्था नसल्याचे आढळून येते. हुकूमशाही व्यवस्थेतील स्थानिक सरकार विशिष्ट वर्गाच्या हातातील बाहूले झाल्यावर देशातील इतर वर्गांकडे आणि त्यांच्या सोयी-सुविधांकडे सरकारचे दुर्लक्ष होते. याचा परिणाम त्या देशातील तरुणवर्ग असंतुष्ट होण्यावर होतो. अशा वेळी हा तरुणवर्ग थोड्याशा पैशांसाठी सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता तिथल्या स्थानिक धार्मिक संघटनांच्या हवाली होउन जातो. अशा परिस्थितीमुळे या धार्मिक संघटनांना तिथे फोफावण्यास वाव मिळतो आणि त्या स्वत:चे देशाच्या व्यवस्थेत आपले विशिष्ट राजकिय-सामाजिक स्थान निर्माण करुन ठेवतात. या संघटना सरकारबाह्य असल्याने सरकारच्या विरोधास्तव तिथल्या सरकारला त्या उपद्रव निर्माण करतात. यामुळे देशांतर्गत तेढ निर्माण होते. नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी या संघटना रोजगार, शिक्षण, वैद्यकीय सेवा, न्यायव्यवस्था अशा सेवा पुरवितात. अशा परिस्थितीतून आलेल्या लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदाही या संघटना घेतात. या आणि अशा अनेक बाबींचा संपूर्ण जगातला अनूभव संदिप वासलेकरांनी आपल्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकातून सामान्य माणसाची मानसिकता बदलण्यासाठी मांडला आहे.
याविषयी तुम्ही फेसबूकवरही माहिती वाचू आणि चर्चा करु शकता. विषय आवडल्यास “Like”वर जरूर क्लिक करा.
http://www.facebook.com/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744
— तुषार भामरे
Leave a Reply