आज डिसेंबरची एक तारीख .. दिन है सुहाना आज पहेली तारीख है..’
हे १९५४ साली आलेल्या, ‘पहेली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेलं एक अफलातून गाणे, अजूनही रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला सकाळी लागते. पहिल्या तारखेला होणाऱ्या पगाराची किमया सांगणारं, सहा मोठी कडवी असलेलं कदाचित त्याकाळी हे सर्वात मोठं गाणं असावं. दर वर्षी एक जानेवारीला मात्र हे गाणं पूर्ण लावलं जातं. या भन्नाट गाण्याचं संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा नेने. (ज्यांनी १९४४ साली ‘रामशास्त्री’ दिग्दर्शित केला होता. नंतरच्या काळात त्यांचा पु.लं.च्या ‘तुझे आहे तुजपाशी’मधला ‘काकाजी’देखील स्टेजवर पाहिल्याचं आठवतंय.) त्या चित्रपटात त्यांनी निरुपा रॉयबरोबर भूमिकाही केली होती. हे गाणं लिहिलं होतं कमर जलालाबादी यांनी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
Leave a Reply