काय केले दुःख विसरण्याला
मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।।
निराशेच्या काळांत
दुःख होते मनांत
हार झाली जीवनांत
शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।।
मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
चूक राई एवढे
दुःखाचा पर्वत पडे
मनीं पश्चाताप घडे
भोग भोगण्या, झालो तयार ।।२।।
मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला
एकाग्र चित्तांत
जातां ध्यानांत
डूबता आनंदात
विसरुन गेलो जगाला ।।३।।
मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
सारी ऊर्जा जाई
ध्यानांत एकरुप होई
त्यांत ईश्वर पाही
ऊर्जा शिल्लक न राही, दुःख भावनेला ।।४।।
मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply