नवीन लेखन...

दुधात साखर !

ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत. अस्पार्टेम, सॅकरिन यासारख्या पदार्थांची गोडी साखरेच्या गोडीच्या कितीतरी पट अधिक असल्यामुळेच त्यांचा वापर केला जातो. कारण अशी त्यांची गोडी अधिक असल्यामुळं जिथं नेहमीची साखर बचकभर लागते तिथं या कृत्रिम साखरेची चिमूट पुरेशी ठरते. त्यामुळे शरीरात कमी उष्मांक जातात. आणि साखरेत उतरणार्‍या ग्लुकोजचं प्रमाण चांगलंच घटतं. मधुमेहाचा विकार जडलेल्या व्याक्तिंच्या शरीराला जादा भार विनाकारण सहन करावा लागत नाही. तरीही त्यांचा सढळ वापर करणंही घातकच असतं. शिवाय जे पदार्थ शिजवायचे असतात अशांमध्ये या कृत्रिम साखरी घालता येत नाहीत. कारण शिजवताना जे काही रासायनिक बदल घडून येतात ते या कृत्रिम साखरी घातल्यास शरीराला अपायकारक ठरू शकतात. नैसर्गिक अशा बहुतेक सगळ्या साखरींची गोडी सुक्रोजपेक्षा कमीच भरते. याला अपवाद फ्रुक्टोजचा. त्याची गोडी सुक्रोजच्या दीडपट असते. सायक्लामेट ही एक कृत्रिम साखर सुक्रोजच्या तीसपट गोड असते. आपल्याकडे सहसा सॅकरिनचा वापर केला जातो. ती कृत्रिम साखर सुक्रोजच्या ३०० पट गोड असते. म्हणजे एक चमचा साखर घातल्यावर जेवढी गोडी मिळेल तेवढी मिळवायला त्या चमच्याचा तीनशेवा हिस्सा सॅकरीन पुरेसं ठरतं. पण आफ्रिकेत मिळणार्‍या काटेम्फे नावाच्या एका फळातून थॉमॅटिन नावाचा एक पदार्थ मिळवला गेला आहे. त्याची गोडी सुक्रोजच्या ३००० पट असते. थॉमॅटिन हे एक प्रथिन आहे. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारल्यासारखं आहे. प्रथिनाची गरजही भागवली जाईल आणि विनाकारण जास्ती उष्मांकाचा माराही सहन करावा लागणार नाही. म्हणजेच दुधात साखर!

डॉ. बाळ फोंडके

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..