धार्मिक स्थळांवर देव आणि धार्माच्या नावावर होणार्या बाजारी करणाचा वेध या चित्रपटातनं विनोदी अंगानं मांडल्यामुळे आशय विषय मनाला भिडतो. अगदी नेमकेपणाने दिग्दर्शकानं या चित्रपटातून भारतात तीर्थक्षेत्रांचा किंवा धार्मिक स्थळांमुळे त्याच्या आसपास परिसराचा झालेला विकास जो कदाचित बुद्धिमत्तेमुळे किंवा सरकारच्या, समाजाच्या इच्छाशक्तीमुळे होणं गरजेचं होतं पण तसं न होता एक वेगळ्याच मार्गाने होतो आहे हे या चित्रपटातून उमेश कुलकर्णी यांनी दाखवल्यामुळे या चित्रपटाला ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” आणि गिरीश कुलकर्णी यांना “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, शर्वाणी पिल्ले, अतिशा नाईक, उषा नाडकर्णी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
चला तर मग पाहूया, २०११ साली प्रदर्शित झालेला देऊळ हा चित्रपट..
—
Leave a Reply