नवीन लेखन...

देवस्वरूपा कामधेनु: वैज्ञानिक महत्त्व

आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे.

देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी त्यांचे संकलन संपादन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे. पृ. 140 कि. 125 ISBN : 978-93-80232-22-5गायीचे वैज्ञानिक महत्त्व अपार आहे म्हणूनच तिला आपल्या ऋषी मुनीनी जितके महत्वाचे देवतेचे स्थान दिले आहे किंबहुना तिच्या शरीरात सर्व देवतांचा निवास असल्याचे सांगितले आहे. परंतु आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नचिकेत प्रकाशनाने देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी केले परिश्रमपूर्वक त्यांचे संकलन संपादन आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे तीच परिचयार्थ देत आहोत.“गाय रूद्राची माता, वसूंची पुत्री, अदितिपुत्रांची बहिण आणि धृतरूपी अमृतांचे भंडार आहे. प्रत्येक विचारवंतांना मी हेच समजावू इच्छितो की, निरपराध आणि अवध्य अशा गोमातेचा वध करू नका.” ऋग्वेदातील गो सुक्ति म्हणून ज्या ऋचा आहेत त्यातील पुढील ऋचा त्या काळचे जनमानस व्यक्त करते.माता रूद्राणां दुहिता वसूनां स्व सादिव्यानाममृतस्य नाभि:। प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदिनीं वधिष्ठ ।। आजचा मानव प्रगतीच्या शिखरावर पोचतो आहे. भौतिकी आणि रसायन शास्त्रादिंच्या चक्रव्युहात अडकलेला हा अभिमन्यू मानव हे भावनिक वा धार्मिक आवाहन नाकारतो. कारण त्याच्या मते विज्ञान जर आपल्या सर्व गरजा भागवू शकते तर या अशा धार्मिक व भावनिक दाखल्यांची उपयुक्तता काय? असा प्रश्र्न त्याच्यापुढे येतो. वस्तुत: पूर्वाग्रह सोडून जर विचार केला तर असे आढळून येईल की धर्म आणि विज्ञान या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी शरीर हे पंचभूतात्मक आहे व त्यात एक अद्‌भूत सामंजस्य असणे आवश्यक आहे, हे आता सर्व विज्ञानप्रेमी मानतात. हे सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी एक सूक्त अजून उदधृत करतो. “अन्नाद्‌भवति भूतानी पर्जन्यादन्न सम्भव: यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ:कर्म समुद्भव:”यज्ञामुळे पर्जन्य, त्यामुळे अन्न व अंततोगत्वा आपले समुचित पोषण असे चक्र अव्याहत सुरू आहे. अशा या यज्ञ कर्माची प्रधानकारक गौ आहे. गाईच्या दुधापासून दही, लोणी, धृत आणि गोमूत्र, गोमया बद्दल, आता पर्याप्त संशोधन झाले आहे आणि या सर्व वस्तू यज्ञीय साधने होत. विस्तार भयास्तव याच्या अधिक विवेचनाची येथे आवश्यकता नाही. परंतु अवश्य असे म्हणता येईल की, धार्मिक, आर्थिक, आणि वैज्ञानिक अर्थाने या संपूर्ण परमेश्र्वरी सृष्टिमध्ये गाईचे स्थान सर्वोपरी आहे, विशेषत: भारतासारख्या कृषीप्रधान देशाला याचे विस्मरण होता कामा नये. “गाव प्रतिष्ठा भूतानाम्‌” असे म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी या तथ्याचा स्वीकार केलेला आहे. प्राणिमात्रांच्या सर्व क्रियाकलापांमध्ये गो महिमा इतकी व्याप्त झालेली आपणास खालील गोशब्द कोषांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास कळेल. गोत्र, ऋषी, पर्वत, नद्या, वनस्पती, धान्य, तीर्थस्थाने, ईशविग्रह, उपकरणे, सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारका समूह, अखिल ब्रम्हांड गो शब्दांच्या विविध रूपाने अलंकृत आहेत आणि हेच गोरक्षा अभियानाचे सूत्र आहे. अदिती पदाचे दोन अर्थ आहेत.

1. दिति-तुकडे करणे-विभागणे अर्थात जे तुकडे करण्यायोग्य वा विभागण्यायोग्य नव्हे ती अदिति 2. अदनात अदिति: भक्षण करण्यायोग्य-दूध-दही, लोणी, तूप देणारी व कृषी योग्य बैल देणारी आणि तद्‌द्वारा धान्य-संपत्ती व वैभव देणारी हे दोन्ही अर्थ गाईचे पर्यायवाची शब्द आहेत.“अदितिद्यौंरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्र:। विश्र्वेदेवा अदिति: पंचजना अदितिजीत मदितिर्वनिस्वम्‌ ।।” अदिती द्युलोक, अन्तरिक्ष, माता, पिता, पुत्र व सर्व देवता या सर्वामध्ये आहे. अदिती हिच अतीत कालीन वस्तुसमूह असून भविष्यकालीन वस्तुसमूह तिच्याच मुळे आहेत.खालील संकलित गो-शब्द भंडाराकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास ऋग्वेदाच्या उपरोक्त सूक्ताची यथार्थता पटेल.

गो आधारित शब्द कोश तीर्थ क्षेत्र : वनस्पति धान्य : गोकर्ण  गोकृष्णा-(अश्र्वगंधा)  गोतीर्थ  गोक्षय  गोत्र :  गोजिव्हा गोयनका  गोधूम (गहू) गोभिल गोस्तनी (मनुका) ऋषी : गोचन्दन गौतम गोरखमुंडी-गोखरू गोभिल उपकरण : गोरखनाथ गोकीळ-(मूसळ-नांगर) गोस्वामी गोदारण- कुदळ उपनिषद व ब्राम्हणे : गोमुखी-(जपाची पिशवी) गोपाल तापनी उपनिषदि गवाक्ष -खिडकी गोभिलीय गृह्यसूत्रे गोपथ ब्राम्हण ईशविग्रह देवता व विशेषनाम : गोकर्णेश्वर गोदुह गोणी (पात्र) गोपीजनवल्लभ गोधन गोचारक गोत्रसूता (पार्वती) गोपाल गोच्छगल गोमभिद्‌ (इंद्र) गोधा (वळू) गोत्र गोपूत्र (कर्ण) गोवर्धन (पर्वत) गोसूक्त गोमय गोरखपूर (शहर) गोचरी (भिक्षावृत्ती) गोचर्म गोमति (नदी) गोधुली गोमूत्र गोदावरी (नदी) पंचगव्य गंगा (नदी) गोष्ठ गोअग्र गोवत्स गोअर्घ गोदान गोईठा (गोवर्‍या).

गो चा यौगिक अर्थ : गच्छति इति गौ: = जी भ्रमणशील आहे, गतिशील आहे ती च गौ आहे. संपूर्ण ब्रम्हांड गतिशील आहे म्हणून या अर्थाने संपूर्ण विश्र्व गो च आहे. विश्र्वात अस्तित्वात असलेल्या पदार्थाचा वाचक शब्द गो आहे. निघंटुकारानुसार स्व:। पृश्र्नि:। नाक:। गौ:। विष्ट्‌प। नभ: ही पदे द्युलोक व सूर्याचे वाचक असून या नुसार गो चा अर्थ स्वर्गलोक, द्युलोक आणि सूर्य असा होतो. सूर्य तथा अन्य प्रकाश किरणे ही गो-पद वाच्य आहेत. निघंटुनुसार किरण वाचक एकूण 15 शब्द आहेत, त्यापैकी एक गो आहे. प्रकाश किरणे विश्र्वव्यापी असल्याने गो विश्र्वव्यापी आहे. ङ्गगावोहि विश्र्वस्य मातर:ङ्घ या उक्तिचे आपोआपच समर्थन होते. याचप्रमाणे नक्षत्रांनासुद्धा ते भ्रमणशील (गतिशील) असल्याने गो ही संज्ञा आहे. याप्रमाणे द्युलोक व त्याच्या अंतर्गत येणार्‍या पदार्थांचा वाचक शब्द गो आहे. निघण्टुकारानुसार पृथ्वीवाचक 21 वैदिक शब्द आहेत. त्यापैकी एक गो आहे. याचाच अर्थ पृथ्वीवर असलेले सर्व गतिमान प्राणी गो या शब्दाने व्यक्त होतात. आपल्या शरीरावर असलेले रोम: आपली इंंद्रिये व पृथ्वी गर्भात असलेली सर्व खनिजे, आपली वाणी, वक्तृत्व आणि शब्द हे सर्व गो पदांनी बोधित होतात. याचप्रमाणे भूमीपासून उत्पन्न सर्व अन्न-धान्य, वृक्ष आणि वनस्पती हे सर्व गो या पदांनी व्यक्त होतात. ज्याप्रमाणे गाईंपासून उत्पन्न होणारे दूध, दही, लोणी, ताक, तूप आदी पदार्थांना गो म्हणण्याचा प्रघात आहे. तद्वतच भूमिरूपी गौ पासून उत्पन्न सर्व वस्तू गो शब्दांनी परिलक्षित होतात व या अर्थाने गो द्युलोक वाची पद आहे.गो शब्द अन्यान्य भाषांमध्ये पाहू गेल्यास एक मनोरंजक वस्तुस्थिती आपल्या समोर येते ती आपण बघू या. 1. प्राचीन इंग्लिश – अपसश्रे डरुरप कू र्उी 6. उच्च जर्मन लर्हीे चुओ कुओ 2. प्राचीन सेक्सन र्घी कू 7. जर्मन र्घीह कु 3. मध्य कालीन डच घेश कोए 8. स्विडीश घेश को 4. डच घेश कोए 9. डॅनिश घे को 5. निम्न जर्मन घे को 10. आर्यन र्ॠुेीी गौ (द्वि: ॠुेा गाम) 11. संस्कृत : गौ-गां-गो यावरून हे स्पष्ट आहे की गो शब्द वैदिक भाषेतून इतर भाषेत संक्रमित झाला. विदेशी भाषेतील उच्चाटण तथा लिपीच्या मर्यादेमुळे गो शब्दाचे बिघडलेले रूप आजही त्या भाषांमध्ये पहावयास मिळते.अशी ही सर्वव्यापी, सर्वमंगलकारक, परम पूजनीय श्रीमती गौ जिच्यामुळे संपूर्ण ब्रम्हांड आणि जीवनजगतमात्र उपकृत आहोत, ती ऐहिक व पारमार्थिक दृष्टीने पूजनीय आहे. या साठीच सर्वदेवमये देवि सर्व दैवेरलंकृते। मातर्ममाभिलषितं सफलं कूरू नंदिनी।। असे सार्थ विवेचन प्राचीन शास्त्रमर्मज्ञांनी केले आहे. श्रीमती गौ शास्त्रदृष्ट्या पशू नव्हे. शास्त्राचेच एक वचन आहे “तिलं न धान्यं-पशवो न गाव:” म्हणून तिला पशू कृपया संबोधू नये. साक्षात्‌ परमात्मा श्रीकृष्णाने आपल्या आचरणाने गोपालन आणि गोसंरक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो कृपया लक्षात ठेवा. केवळ गाईच्या स्पर्शाने अनेक रोग बरे होतात, अनुभव घेऊन पहा.

भारतीयांनी जेव्हापासून गोसेवेची उपेक्षा केली, तोच आपल्या दुर्दशेचा आरंभ बिंदू आहे, हे जर नीट समजून घेतले तर आम्ही सर्व भारतीय आता वेळ न दवडता गोरक्षा, गोसंवर्धन, गोपालन आणि गोसेेवेसाठी कटिबद्ध होऊ या आणि आपल्या देशास पूर्ववत सुखी,संपन्न आणि सदाचारी होण्यास सिद्ध होऊ या.

देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व
नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार
पाने : १४०
किंमत : १२५ रू.

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..