भगवान शंकराच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले.
दक्ष ही प्रजापती हा अदितीचा पुत्र, मनुप्रजापतीची कन्या प्रसुती ही दक्षची पत्नी. ह्या पत्नीपासून दक्षाला एकूण 16 कन्या झाल्या. त्यापैकी श्रध्दा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, प्रिया, उन्नती, बुध्दी, मेधा, तितक्षा आपि मूर्ती ह्या कन्या दक्षाने धर्मप्रजापतीला दिल्या. स्वाहा अग्नीला दिली, स्वधा आणि अग्नी आप्तांना दिल्या. सती शंकरांना दिली.
दक्ष प्रजापती एकदा नैमिषारण्यात गेला असताना सर्व देवांनी व ऋषींनी त्याचा आदर सत्कार केला परंतु शंकरांनी दक्षाच्या आदर सत्कारात भाग घेतला नाही. अर्थात दक्ष प्रजापतीच्या शंकराची म्हणजेच जावयाची ही वर्तणूक आवडली नाही व त्याने भगवान शंकरांचा सूड घेण्याचे ठरविले.
कांही दिवसांनी दक्ष प्रजापतीने बृहस्पती याग करण्याचे ठरविले व नैमिषारण्यात घडलेल्या घटनेचा सूड उगविण्यासाठी भगवान शंकरांना या यागाचे आमंत्रण हेतुपुरस्सर दिले नाही. मात्र इतर सर्व ऋषी, देव यांना आमंत्रण दिले. आपल्या पित्याकडे होत असलेल्गया बृहस्पती यागाची बातमी सतीला नारदमुनीकडून समजली. पित्याकडून आपल्याला आमंत्रण देण्याचे चुकून राहून गेले असे वाटून यज्ञाला जाण्यासाठी तिने शंकराची अनुमती मागितली पण विनास आमंत्रण तेथे जाण्यास शंकांनी विरोध दर्शविला. पण सतीच्या आग्रहामुळे शंकांच्या मनात नसतानाही त्यांनी आपले ूद्गण सतीबोब पाठविले व सती यज्ञ समारंभासाठी पित्याकडे गेली. यज्ञमंडपात सती पोहोचली खरी पण तिचे आगमन दक्षला सतीच्या इतर बहिणीनांही रुचले नाही. तथापि सतीने हा अपमान सहन केला.
यागासाठी हवन चालू होती. एकामागून एक आहुती पडत होत्या. सर्व देवतांना आहुती देण्याचे कार्य चालू होते पण शंकरांना आहुती देण्याचे मंत्र ज्यावेळेस आले त्यावेळेस शंकरावर सूड घेण्याच्या बुध्दीने दक्षाने ते मंत्र म्हणण्यास मनाई केली. दक्षाने आरंभिलेला हा यज्ञ हरिद्वारजवळ असलेल्या कनखळ या गावी झालेला आहे. दक्ष महादेव मंदिर असून दक्षाने केलेल्या बृहस्पती यागाचे कुंडली पहावयास मिळते.
भगवान शंकरांच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले. काही ग्रंथामध्ये सतीने यज्ञकुंडाजवळ योगासन घालून बैठक मारली व योग सामर्थ्याने आपल्या उदरातील अग्नी – जठराग्नी प्रदिप्त करुन स्वत:ला जाळून घेतले. असा उल्लेख आहे. काही असले तरी सतीने आत्मसमर्पण केले हा मतितार्थ त्यातून निघतो. नेमक्या त्याच वेळी यज्ञभूमीतून एक कोकीळपक्षी उडून गेला. सतीच्या ह्या अद्भुत कृत्याने सर्व रुद्रगणात एकच हाहा:कार उडाला.
कैलास पर्वतावर शंकरांनासतीच्या मृत्यूची वार्ता कळविण्यात आली. ती बातमी ऐकल्याबरोबर शंकरांना दक्षाचा अतीव संताप आला. त्यांनी आपल्या जटेतून एक केस उपटून काढला व जोराने आपटला त्यावेळी त्यातून एका बाजूला वीरभद्र नामक रुद्रगण व दुसर्या बाजूने महाकाली देवी उत्पन्न झाली असा उल्लेख शिवपुराणातील रुद्रसंहितेमध्ये आहे. दक्षाचे समूळ पारिपत्य करण्याची जबाबदारी वीरभद्रावर सोपविण्यात आली. असंख्य रुद्रगण त्याच्या अधिपत्याखाली देण्यात आले.
वायुवेगाने वीरभद्र यज्ञभुमीत आला व त्याने सरळ यज्ञमंडपावर हल्ला केला. अचानक आलेल्या या विध्वसंक अरिष्टामुळे सर्वत्र एकच हल्लकल्लोळ उडाला. वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला व त्याचे मस्तक अग्नीलाच समर्पण करुन टाकले व बाकीचा मृतदेह तसाच तेथे पडून राहिला. दक्षपत्नी प्रसुतीला हा वृत्तांत कळताच तिनेही अग्नीनारायणाला आपला देह समर्पण करण्याचे ठरविले. त्यानुसार ती अग्नीत उडी टाकणार तोच यज्ञभूमीतून सतीच्या आत्मसमर्पणानंतर उडालेली कोकीळा त्या ठिकाणी आली व व तिच्या तोंडून वाणी बाहेर पडली.
“हे प्रसुती, तू आत्मसमर्पण करु नकोस. तू दीर्घ तपश्चर्या कर. म्हणजे तुला तुझा पती पुन्हा जिवंत करुन मिळेल.”
त्या कोकीळेची ही वेदतुल्यासारखी वाणी ऐकल्यावर प्रसुती आश्चर्यचकित झाली. कोकीळेच्या वाणीवर विश्वास ठेवून तिने आत्मसमर्पणाचा विचार रद्द केला. व त्याच ठिकाणी उग्र तपश्चर्या करण्यास आरंभ केला.
तत्पूर्वी सतीने ज्याठिकाणी देहत्याग केला होता त्याठिकाणी शंकर यज्ञभूमीत अवतरले आणि दु:खावेगाने बेभान झाले. त्यांनी सतीचा मृतदेह उचलला आपल्या खांद्यावर टाकला आणि तांडवनृत्य करीत सर्वत्र संचार करु लागले. शंकर शांत होण्याचे चिन्ह दिसेना. त्याचे संहाराचे कार्य स्थगित झाले त्यामुळे ब्रह्या, विष्णु आदि देवतांना फार चिंता उत्पन्न झाली. जोपर्यंत सतीचा देह शंकराच्या खांद्यावर आहे तोपर्यंत शंकर शांत होणार नाहीत हे शंकरांनी जाणले व त्यांनी आपले सुदर्शन चक्र सतीच्या देहावर सोडून तिच्या देहाचे लहान लहान तुकडे करण्यास प्रारंभ केला. तिच्या देहाचे अनेक तुकडे सर्वत्र विखुरले गेले. सती म्हणजे प्रत्यक्ष आदिशक्तिचे स्वरुप असल्याने ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली.
तंत्रचूडामणी व महापीठनिर्णय या ग्रंथामध्ये ५१ शक्तिपीठांचा उल्लेख आहे तसेच कोणत्या ठिकाणी सतीचा कोणता अवयव पडला तेथील शक्ति कोणती, भैरव कोण याचीही माहिती आहे.
देवीभागवतमध्ये ५१ शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात खालील उल्लेख आहे.
पंचाशदेक पीठानि एवं भेरवंदेवत: ।
अंगप्रत्यंगपातेन विष्णुचक्र क्षतेन च ।।
याप्रमाणे देवीची ५१ शक्तिपीठे असून त्यापैकी भारतात ४३, नेपाळमध्ये २, श्रीलंका येथे १, चीन – तिबेट येथे १ तर पाकिस्तानात ४ अशी शक्तिपीठे आहेत.
दक्षपत्नी प्रसुती हिने जी उग्र तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला होता त्यामुळे तिच्या देहाचा केवळ अस्थिपंजर सांगाडा शिल्लक राहिला होता पण तिने त्याची पर्वा केली नाही. भक्तिभावाने ती तपाचरण करीतच होती. त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्यदेव तिच्यासमोर प्रकट झाले. शंकरांचा क्रोधही तोपर्यंत शांत झाला होता त्यामुळे ब्रह्यदेवांनी शंकराची प्रार्थना करताच शंकर प्रकट झाले व त्यानी दक्षाला जिवंत करण्याचे मान्य केले परंतु दक्षाचे मृतशरीरच त्याठिकाणी होते. मस्तक तर केव्हाच यज्ञकुंडात भस्मसात झाले होते. मस्तकाशिवाय देह जिवंत करुन काय उपयोग म्हणून त्यांनी तेथे असलेल्या यज्ञीय बोकडाचे शिर दक्षाच्या शरीराला चिकटविले व त्याला जिवंत केले.
डॉ. माधवी बाळकृष्ण कळमकर
चिंचवडगांव, पुणे
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)
— डॉ. माधवी बाळकृष्ण कळमकर
Leave a Reply