नवीन लेखन...

दोन्ही डावात शतक आणि जॉफचे शतकांचे शतक





दोन्ही डावात शतक आणि जॉफचे शतकांचे शतक

11 ऑगस्ट 1909 रोजी वॉरन ‘कर्ली’ बार्डस्ले या ऑसी फलंदाजाने ओवलवरील कसोटीत 130 धावा काढल्या आणि संयम, फलंदाजीची तंत्रशुद्धता व मानसिक कणखरतेचे द्योतक असलेला एक दंडक त्याने पुढच्या काळातील फलंदाजांसाठी घालून दिला. पहिल्या डावात वॉरनने (वॉरन हे त्याचे जन्मगावही होते) 136 धावा काढल्या होत्या. एका कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके असा पराक्रम करणारा बार्डस्ले हा पहिलाच खेळाडू ठरला. बार्डस्लेच्या कारकिर्दीतील ही अवघी पाचवी कसोटी होती आणि याआधीच्या कारकिर्दीतील एका डावातील त्याच्या सर्वोच्च धावा होत्या फक्त 46 एवढ्याच. क्रिकेटमधील काही विक्रमांची फक्त बरोबरी केली जाऊ शकते, ते मोडले जाऊ शकत नाहीत. अशांपैकीच हा एक विक्रम होता. बार्डस्लेच्या बॅटसोबतच्या कामगिरीमुळे हा सामना अनिर्णित राहिला आणि ती मालिका कांगारूंना 2-1 अशा फरकाने जिंकता आली. ‘विज्डेन’ या क्रिकेटगाथेने निवडलेल्या 1910 या इसवी सनाचा मानकरी खेळाडू वॉरन होता.

1910-11चा हंगामही वॉरनने गाजवला. नंतर मात्र पहिल्या महायुद्धामुळे त्याच्या कारकिर्दीतील उमेदीची वर्षे वाया गेली. 1920मध्ये कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित झाले तेव्हा वॉरन वयाच्या पस्तिशीत होता. त्याचा धडाका नंतर टिकला नाही. एका कसोटीत दोन शतके काढणार्‍या या फलंदाजाला आपल्या कारकिर्दीतील पुढच्या शतकासाठी तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली. जून 1926मध्ये त्याने लॉर्ड्सवर नाबाद 193 धावा काढल्या.

शतकांचे शतक

11 ऑगस्ट 1977 रोजी जॉफ बॉयकॉटने हेंडिंग्ली या घरच्या मैदानावर कसोटी पुनरागमन केले आणि प्रथम श्रेणी सामन्यांमधील आपल्या शतकांचे शतक पूर्ण केले. शतकी शतक कसोटी सामन्यात काढणारा बॉयकॉट हा पहिलाच खेळाडू ठरला. या डावात त्याने

एकूण 191 धावा केल्या. बॉयकॉटने खिळ्याचे बूट अखेर खुंटीला टांगले तेव्हा त्याच्या पोतडीत 151 प्रथमश्रेणी शतके होती आणि

48,426 धावा. ‘सच्चू’ची शतके आणि धावा पाहून कुणाचा उर दडपत असेल तर कृपा करून पुढे वाचू नका.

– प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज आहे सर जॅक हॉब्ज. त्याने (वाद असलेले सामने वगळूनसुद्धा) किमान 60,000 धावा आणि किमान 195 शतके केलेली आहेत!!

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..