* काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण असलेले जेवण दिवसातून ६ वेळा घेणे गरजेचे आहे.
रात्रीचे जेवण नेहमी हलके घ्या, ज्यात फायब्रस काबरेहायड्रेट्सचा समावेश असेल. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा.
* काबरेहायड्रेट्स, शर्करा आणि चरबी, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या तळलेल्या पदार्थाचा समावेश जेवणात करणे टाळा.
* शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.
* शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहील याची काळजी घ्या. डिहायड्रेट झालेले शरीर वजन घटवू शकत नाही, त्यामुळेच किमान ३ लिटर पाणी दिवसाला प्यायलेच पाहिजे.
* संध्याकाळचे अति खाणे टाळून त्यांच्या जागी दाणे, गाजर, काकडी यांचा समावेश करा.
* ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.
* तुम्ही किती व्यायाम करता यावरही प्रत्येक आठवडय़ाला तुमचे वजन किती कमी होईल हे अवलंबून असते. आठवडय़ातील तीन दिवस वेट ट्रेिनग आणि तीन दिवस धावणे, पोहणे यांसारखी काíडओव्हॅस्क्युलर ट्रेनिग आठवडय़ातून ३ वेळा करणे गरजेचे आहे.
* मासे किंवा मटणपेक्षा चरबीचे प्रमाण कमी असलेले प्रोटिनयुक्त चिकन खाणे महत्त्वाचे आहे. शाकाहारींसाठी मलईरहित (स्किम्ड) दुग्धजन्य पदार्थ, दही आणि पनीर खाणे कधीही श्रेयस्कर.
* दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा दर २ ते ३ तासांनी खाणे कधीही योग्य. त्यामुळे अधिकाधिक कॅलरी जाळण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply