स्वातंत्र्य चळवळीसाठी महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला ज्यांनी तनमनधनाने मदत केली त्यात जमनालाल बजाज यांचा फार मोठा वाटा आहे. जमनालाल बजाज यांच्या पायाशी सारे वैभव लोळण घेत पडलेले असतानाही ते त्याच्यापासून अलिप्तच राहिले. आयुष्यात कोणी तरी चांगला गुरु लाभावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्या वेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून नुकतेच भारतात परतले होते व त्यांनी सत्याग्रही चळवळीचा श्री गणेशा केला होता. जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर आश्रमात राहून त्यांचे कार्य अगदी जवळून पाहिले व आपल्या मनात असलेली गुरुंची प्रतिमा ती हीच असे त्यांच्या मनाने पक्के केले. परंतु गुरुपेक्षा आपण त्यांना धमपिताच मानले तर? असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी मला तुमचा पाचवा पुत्र माना, हा विचार गांधीजींना बोलून दाखविल्यावर त्यांनीही त्यास मान्यता दिली. त्याचा खूप मोठा आनंद जमनालाल यांना झाला व आपल्या धर्मपित्याचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी निश्चय केला. एकदा मात्र मोठी गंमत झाली. महात्माजींनी जमनालाल बजाज यांना लिहिलेल्या एका पत्रात ‘ भाई जमनालाल’ असा सरळ उल्लेख केला. ते पत्र वाचल्यानंतर जमनालालजींना तो उल्लेख खटकला. महात्माजींची भेट झाल्यावर ते त्यांना म्हणाले, ” तुम्ही दर वेळी मला चिरंजीव असे लिहिता मग याचवेळी ‘ भाई जमनालाल’ असा उल्लेख का केलात? माझे काही चुकले का? पुत्रधर्माला न शोभेल असं वर्तन माझ्या हातून घडले काय?” त्यावर महात्मा गांधी त्यांना म्हणाले, ” तुझे काहीच चुकले नाही परंतु मलाच शंका आली की, तुमचा धर्मपिता व्हायला मी लायक आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला चिरंजीव म्हणण्याचा मला कितपत अधिकार आहे?” गांधीजी हे सारे नम्रतेमुळे म्हणाले हे जमनालालजींना कळायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांना धर्मपिताच मागून पुढे प्रत्येक कार्यात त्यांना पुत्रासारखेच सहकार्य केले. त्यामुळेच जमनालालजींचे जेव्हा आकस्मिक निधन झाले तेव्हा ‘ असा दुसरा पुत्र मी आता कोठून आणू? असे भावोद्गार महात्माजींनी काढले.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply