आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कोडा, फार्च्यूनर, इनोवा, सफारी, स्कार्पियो गाडीतून “मागासवर्गीय” उतरतील….!
“बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं” ह्या ओळीच्या प्रचंड यशानंतर आता त्या गाड्यांच्या मागे पुढील ओळी दिसतील –
१. बघतोस काय रागाने, आरक्षण मिळवलेय वाघाने…
२. माज आहे मला मी मागासवर्गीय असल्याचा…
३. सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी मागास जात आमची…!!
४. मी ९६ कुळी मागास…
५. बघतोस काय रागानं, शेपुट घातलीय वाघानं..
६. कळपातून येतात ते कोल्हे, आरक्षणातून येतात ते वाघ..
७. आता नको खर्च, आरक्षण आहे घरचं…
८. फटक्यात आरक्षण झटक्यात अॅडमिशन..
९. दादा आरक्षणाच्या तोर्यात, बाकी सगळे खोर्यात..
१०. केला आरक्षणाचा नाद, सर्वे झाले बाद
११. मारली आरक्षणाची गोळी, खल्लास आख्खी टोळी.
तळटीप –
एका बाजूला लिहा. ..”राजकीय पूर्वजांचा आशीर्वाद”….
आणि दुसर्या बाजूला. ..”जनता बँकेच्या ‘अर्थ’सहाय्यातून”…
— दयानंद नेने