नवीन लेखन...

नववर्ष श्रीकृष्णभक्तीमय होवो

  सरत्या वर्षाला निरोप देत आम्ही नुकताच नवीन २०११ या वर्षात प्रवेश केलाय. हे वर्ष मराठी सृष्टीच्या वाचकांना सुखाचे समृद्धीचे जावो आणि हे संपूर्ण नववर्ष श्रीकृष्ण भक्तीने ओतप्रोत भरून जावो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.या नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भगवान श्रीकृष्णांचा अवतार असलेल्या भगवान श्रीचैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीविषयी थोडक्यात काही सांगण्याचा मी प्रयत्न करतो. इस्कॉनचे (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) संस्थापक कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या मते श्रीचैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीकृष्णांची श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण यात काहीच अंतर नाही. श्रीचैतन्य महाप्रभूंची शिकवण ही भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणुकीचे प्रात्यक्षिक आहे. सर्वांनी केवळ आपल्याला शरण यावे, हा भगवान श्रीकृष्णांचा उपदेश श्रीमद्भगवद्गीतेत अंतिम उपदेश आहे. अशा शरणागत व्यक्तीच्या जीवनाची सर्व सूत्रे भगवान श्रीकृष्ण आपल्या हाती घेतात, असे त्यांचे वचन आहे. क्षीरोदकशायी विष्णू या आपल्या स्वांश रुपाद्वारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान पूर्वीपासूनच सृष्टीचे पालन पोषण करीत असतात. एक लहान मुल माता-पित्यांना, एक पाळीव प्राणी त्याच्या मालकावर पूर्णपणे आश्रित असतो, त्याप्रमाणेच एक शुद्ध भक्त भगवंतांना नित्य शरण गेलेला असतो. भगवान चैतन्य महाप्रभू हे आपल्याला व्रजेंद्रनंदन भगवान श्रीकृष्णांची आराधना शिकवितात. वृंदावन नावाचे ठिकाण भगवान श्रीकृष्णांच्या इतकेच अराध्य आहे. परिपूर्णतेच्या अत्युच्य अवस्थेतील जी अत्युच्च प्रकारची आराधना आहे, तिचे आचरण व्रजवनितांनी अर्थात गोपींनी केले. गोपींनी कोणताही भौतिक किंवा अध्यात्मिक लाभाचा हेतू न धरता भगवान श्रीकृष्णांवर प्रेम केले. भगवान श्रीचैतन्य महाप्रभूंच् या मते मानवी जी
नाचे परम ध्येय भगवान श्रीकृष्णांविषयी शुद्ध प्रेमाचा विकास करणे हा आहे. पद्मासन आदी योगासने न घालताही आपण श्रीविष्णू अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या रुपावर ध्यान करू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत स्पष्ट केले आहे, की सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा

करतो, जोे माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होय. पश्‍चिम बंगालमधील नादिया गावातील मायापूर येथे जन्म झालेल्या चैतन्य महाप्रभू हे भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. शुद्ध जीवन जगून सतत हरीनाम घेण्याचा आग्रह त्यांनी केला. महाप्रभूंच्या भक्तीच्या प्रभावामुळे पापीही कृष्णभक्त झाले. चैतन्य अर्थात प्राणशक्ती. आपले स्वरूखप जीवात्मा असून आपण अमर आहोत. परंतू भौतिक अवस्था आपले अमरत्व प्रकट होऊ देत नाही. शक्ती आणि शक्तीमानात काहीच भेद नाही. राधाराणी कृष्णच आहेत. वैष्णव तत्वज्ञान प्रथमतः भगवंतांच्या ह्लादिनी शक्तीला वंदन करते. सीता-राम, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण. मायावादी विद्वान वैष्णवांसमोर गोंधळून जातात. कारण मायावादी जीवाच्या बंधनाच्या कारणांचे विश्‍लेषण करू शकत नाही.

बाळासाहेब शेटे माझा मोबाईल-९७६७०९३९३९

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..