नवीन वर्ष आपण कसा साजरा करतो यावरून आपली मानसिकता, आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी आणि आपल्यात असणारी सामाजिक जाणिव इ. गोष्टी स्पष्ट होत असतात. आजकाल काही लोकांच्या मते दारू पिऊन धिंगाणा घालणे म्ह्णजे नवीन वर्ष साजरा करणे होय. नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर पासूनच काय मग थर्टीफस्टला कोठे जाणार ? काय खाणार ? काय करणार ? काय पिणार ? कोण कोण येणार आहे ? कसा येणार आहे ? सोय काय केलेय ? कोणी केलेय ? कोठे केलेय ? इ. प्रश्न सतत कानावर पडत असतात. दारू पिऊन धांगड – धिंगा करत नवीन वर्ष साजरा करण्यात आजचे शिक्षीत आणि उच्चशिक्षीत लोक ही मागे नाहीत. नवीन वर्ष कसा साजरा करावा याबाबतीत बहुदा कोणतीच नियमावली तयार झालेली नसावी. ज्याला जस वाटेल तसा तो साजरा करतो. ज्यांना तो साजराच करायचा नसतो ते तो इतरांना साजरा करताना पाहण्यात आनंद मानतात तो ही टी.व्ही.वर . दारू पिऊन धिगांना घालण्यापेक्षा हे बर नाही का ?
सर्वच जण नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन धिंगाना घालूनच करतात असं नाही काही लोक त्या निमित्ताने सहलीच आयोजन करतात, काही लोक आपल्या घरात एखाद्या छोट्या मेजनावीच आयोजन करतात, काही लोक आप-आपल्या कार्य क्षेत्रातील मित्रमंड्ळीना जमवून त्यांच्याशी संवाद साधतात, चर्चा करतात आणि नवीन विचारांच आदान-प्रदान करतात. हे योग्य आणि आपल्या भारतीय संस्कृतीला साजेलसच करतात. नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त लोकांना दारू पाजण्यापेक्षा त्यांना गोड – धोड खायला देण हे योग्य होणार नाही का ?
आयुष्यातील एक वर्ष सरलं म्ह्णून जरी आयुष्य एक वर्षाने सरलेलं असल तरी जगण सरलेलं नसतं आणि जगताना तारतम्य बाळ्गावेच लागते हे विसरून ही चालत नसतं. काही वर्षांपूर्वी भिंतीवरील कॅलेंण्डर संपल की नवीन कॅलेंण्डर भिंतीवर लावण्यापुरतच नवीन वर्षाचं महत्व होत. काहींना रोजनिशी लिहायची सवय असायची आता ब्लॉग लिहायची सवय असते तशी त्या रोजनिशीतील पाने लिहून संपली की समजायच आता वर्ष संपल. वर्ष संपल की त्या वर्षीच्या आठ्वणी त्या रोजनिशीत बंदीस्त व्हायच्या त्या आठवणी चुकून मोकळया झाल्या की त्यातून कविता, कथा अथवा कादंबरीचा जन्म व्हायचा. सरलेलं वर्ष आपल्याला बरंच काही शिकवून गेलेल असत जे आपल्याला पूढ्च वर्ष जगण्यासाठी उपयोगी पडणार असतं. त्यामुळे आपण सरलेल्या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे आपण मनाशी ठाम ठरवायला हंव. मागील वर्षीच्या शेवट्च्या मध्यरात्री प्रत्येकाने काही मिनिटे एकान्तात स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं आपण कोण आहोत ,आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे, हे सारं विसरून, आपला अहंकार बाजूला सारून जीवन क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर जीवनात आपण असं काही केल आहे का ज्यामुळे आपण जग सोडल्यानंतरही लोक आपल नाव आदराने घेतील ? या प्रश्नाच उत्तर सापडताच जर प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्प केला तर येणार प्रत्येक नवीन वर्ष सर्वांनाच सुखा समाधानाच आणि समृध्दीचच जाईल अशी आशा धरायला कोणाचीच काही हरकत नसेल नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply