‘सुधारक’कार आगरकरांचे ‘शिष्य’ ‘तुतारी’कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात-
“जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी”
असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले.
क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते सर्वांचे आवडते कुसुमाग्रज आपल्या ‘प्रेम’ या कवितेत म्हणतात-
“उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ…”
तर मित्रांनो,आजचा जमाना हा सतत अपडेट राहण्याचा आहे.जसे आपले स्मार्टफोन तुम्ही सतत अपडेट करत असतात.तसेच तुम्हांला पण अपडेट रहावे लागणार आहे.’लोक काय म्हणतील’? हे आता जुने झाले आहे.ते आता अपडेट करुन ‘दिल जो कह रहा हे सुनो’ हे नवीन अपडेट तुम्हांला तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल करुन घ्यावे लागणार आहे.नाहीतर तुम्ही सतत हँग होणार हे नक्की.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.समाजाने लागू केलेले नियम आपण पाळत असतो.भलेही ते आपल्या हिताचे नसो.’लोक काय म्हणतील’ ही भावना आपला पिच्छा सोडत नाही.मी असं केलं तर लोक काय म्हणतील यातून कोणीही सुटत नाही.(अगदी प्रेमविवाह करायचा पण लोक काय म्हणतील?)
थोडे स्वार्थी व्हा.सवयींचे गुलाम बनू नका.शेवटी एक तंत्र सांगतो,माणसाला गुलामगिरी सहन होत नाही.किंवा कोणी बोललेलं ही सहन होत नाही.कोणी जर म्हटलं हे तुला जमणार नाही तर आपण पेटून उठतो व ती गोष्ट करुन दाखवितो.
मी माझ्या मनाला नेहमी म्हणतो,’हे तुला जमणार नाही’.मग माझे संपूर्ण शरीर सर्व शक्ती एकवटून बंड करुन उठते(१८५७ सारखे) व ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.
— दीपक गायकवाड
Leave a Reply