खरं तर हा तसा कमी प्रमाणात दिसणारा आजार आहे. तो का होतो, कसा होतो, किती दिवस राहतो याबाबत फार कोणाला माहिती असल्याचे दिसत नाही. असे असताना मग केवळ डॉक्टहरांच्या सल्ल्याने यावर उपचार करत राहणे इतकेच आपल्या हातात उरते. इतकेच नाही तर या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज असल्याचेही दिसून आले आहे.
आपल्याकडे नागीण या रोगाविषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. असा एक गैरसमज आहे की नागीणने जर शरीराला विळखा घातला तर तो माणूस मरतो. पण हा एक फार मोठा गैरसमज आहे. एकतर हा रोग नेहमी अंगाच्या एकाच बाजुला होतो आणि तो नागिणीसारखा वळणे घेत पसरतो. पण अंगाला पूर्ण वळसा कधीच घालत नाही. क्चणचीत वळसा घातलाच तर मरण कधीच येत नाही.
व्हायरस इन्फेक्श न
हे एक खूप वेदनादायक असे त्वचेच्या ज्ञानतंतुंचे किंवा नर्व्हचे इन्फेक्शिन आहे. हे बहुधा त्वचेपुरतेच मर्यादीत असते. क्वचित डोळयाला किंवा शरीरातील इतर अवयवांना होते. त्वचेतल्या नर्व्हचे हे इन्फेक्श न कांजण्या ज्या व्हायरसमुळे होते त्याच व्हायरसमुळे होते. याचे नाव आहे,हर्पीझव्हायरस व्हेरीसीली किंवा व्हेरीसीला झोस्टर व्हायरस. लहान मुलांना याच व्हायरसमुळे कांजण्या होतात. कांजण्या बऱ्या झाल्यावरसुध्दा सगळेच व्हायरस नष्ट होत नाहीत. काही व्हायरस स्पायनलकॉर्ड किंवा मज्जारज्जुच्या जवळच्या भागात जीवंत असतात. पण ते कित्येक वर्ष पेशंटला काहीच त्रास देत नाहीत. सक्रिय होतात कित्येकवर्ष शांतपणे बसल्यावर पेशंटची प्रतिकारशक्तीप काही कारणांनी किंवा कोणत्याही आजारपणाने कमी झाली तर हे व्हायरस सक्रिय होतात आणि नागीण अंगावर प्रकट होते. हे व्हायरस नर्व्हच्या म्हणजे ज्ञानतंतुच्या मुळापासून वर सरकत जातात. त्या नर्व्हला सूज येते. छाती आणि पाठ या भागात नागीण सहसा दिसते. हे एका नर्व्हचे इन्फेक्श.न असल्यामुळे लाल पुरळ एका ठराविक भागातच दिसतात.अंगाला विळखा क्वचितच घालतात.
लक्षणे
अतिशय वेदना हे या नागिणीचे महत्वाचे लक्षण आहे. ते अगदी सुरवातीचेसुध्दा एकटे लक्षण असते. या वेदनांची तीव्रता व्यक्तीहप्रमाणे वेगवेगळी असते. पण वेदना इतक्याा असतात की वैद्यकीय उपचार करणे अत्यंत आवश्याक असते. ताप,डोकेदुखी आणि थकवा ही लक्षणे सुरवातीला दिसतात. पण त्वचेवर पुरळ उठले की ही लक्षणे नाहीशी होतात. नागीण किंवा हर्पीझ चेहऱ्याच्या किंवा डोळयाभोवतीच्या नर्व्हनासुध्दा होते. त्याजागी वेदना आणि डोकेदुखी अतिशय असह्य असते. कंबरेच्या मणक्यारच्या नर्व्हजपासून सुरवात झाली असेल तर कंबर, नितंब या भागात वेदना होतात आणि त्या पायापर्यंत जातात. त्वचेवर पुरळ त्वचेवर पुरळ अगदी सुरवातीला फिकट लालसर दिसतात. पुरळ पुंजक्यांवच्या स्वरुपात दिसतात. मधली जागा चांगली असते. मग हे पुरळ मोठे होतात. त्याचे फोड होतात. फोडांभोवती लाल रेघ दिसते. काही लहान लहान फोड एकत्र येउन त्यांचा एक मोठा फोड होतो. हे पुरळ पाठीच्या मणक्यारपासून सुरु होउन छातीच्या मध्यापर्यत येतात. नर्व्हजच्या इनफेक्श्नचा प्रवास सहसा वरुन खाली होत असतो आणि तो शरीराच्या एकाच बाजुला असतो. सहसा तो विळखा घालत नाही. दुसऱ्या बाजुच्या नर्व्हला इन्फेक्शयन होत नाही. म्हणूनच पाठीकडून छातीकडे आल्यावर ते तिथेच थांबते. नागीण किंवा हर्पीझ सहसा मुलांना होत नाही. व्हायरस मुलांच्या शरीरात शिरलेच तर कांजण्या होतात. संपूर्ण अंगावर पुरळ उमटतात. अगदी क्वचीत गरोदरपणी आईला कांजण्या झाल्या असतील तर बाळाला नागीण झाल्याची उदाहरणे आहेत.
हर्पीझचा प्रवास
हर्पीझ किंवा नागीण तसा अगदी सामान्य रोग आहे. पण त्यात काही कॉम्प्लाकेशन झाली तर मात्र ताबडतोब उपचार करणेआवश्याक असते.योग्य उपचार केले तर वेदना ताबडतोब नाहीशा होतात. पुरळही दिसेनासे होतात. मोठे फोड फुटतात. खपल्या होतात. काही दिवसात खपल्या पडून जातात. दहा ते चौदा दिवसात क्रण भरुन निघतात. पुरळ बरे झाले तरी त्वचेवर काळी किंवा पांढरी रेघेच्या रुपाने वण राहतो. पण हा डागसुध्दा काहीकाळानं पुसटसा होत जातो. काहीवेळा जखम खोलवर जाते.ती भरुन यायला खूप दिवस लागतात आणि त्याचा व्रण मोठा असतो.
ऍलर्जीक पेशंट
दमा किंवा इतर कारणामुळे ऍलर्जी असेल तर अशा पेशंटना वायसोलोन, डेल्टाकॉर्टील, बेटनेसॉल अशी कॉर्टीझोन औषधे द्यावी लागतात. ही औषधे ऍलर्जीवर अतिशय प्रभावी असतात. पण ती काही दिवसासाठीच द्यायची असतात. पण या औषधांनी बरे वाटते असे लक्षात आल्यावर तीच औषधे पेशंट डॉक्टदरांचा सल्ला न घेता वारंवार घेतात. या औषधांमुळे ऍलर्जी नाहीशी होत नाही तर दबून जाते पण या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्तीत कमी होते. अशा पेशंला अतिशय तीक्र स्वरुपाची नागिण होउ शकते. अशा स्वरुपाच्या कॉर्टीझोन औषधांचा उपचार चालू असेल आणि नागीण अंगावर दिसली तर ताबडतोब डॉक्टसरांना दाखवा.
कॉम्प्लीकेशन किंवा उपद्रव
नागीणीचे इन्फेक्शकन डोळयाला होऊ शकते. त्याला हर्पीझ झोस्टर ऑपथॅलमिक असे म्हणतात. हे फक्तण एकाच डोळयाला होते. डोळा सुजतो. उघडताही येत नाही. डोळयाच्या भोवतालची आणि पापण्यांची त्वचा लालसर होते. फोडं येतात. पेशंटच्या डोळयावर कुणीतरी ठोसा मारल्याप्रमाणे डोळा दिसतो. लघवीवर आणि शौच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या नर्व्हजना फार क्वचित हे इन्फेक्शुन होते पण झालेच तर लघ्वी करताना अतिशय वेदना होतात. कधीकधी नागिणीचे फोड तोंडामध्येसुध्दा येतात. जीभेवर होतात. घशातही होतात. घास चावताना खूप आग होते. कानाला फार क्वचित नागिण होते. पण झालीच तर कानाच्या बाहेरच्या भागात होते आणि त्याभागात खूप वेदना असतात चेहऱ्यावरच्या एकाच बाजुच्या भागावर नागीण होउ शकते. यावर वेळीच आणि योग्य इलाज केला नाही तर अर्धांगवाताची शक्याता असते
अतिशय वेदना
काहीवेळा नागीणीची पुरळं लगेच नाहीशी होतात पण नंतर नर्व्हजच्या भागात अतिशय वेदना सुरु होतात. पेशंट पन्नाशी किंवा जास्त वयाचा असेल तर या वेदना अतिशय असह्य असतात. यावर ताबडतोब इलाज करायला हवा. याला पोस्ट हर्पिझ न्युराल्जीया असे म्हणतात. या वेदना अगदी सूक्ष्म प्रमाणात ते अगदी असह्य स्वरुपात असतात. काहीवेळा एकदा सुरु झालेल्या वेदना कित्येक तास कमी होत नाहीत. रात्री झोप तर लागतच नाही शिवाय रोजच्या कामातही अडथळा येतो. यासाठी त्वचारोगतज्ञाला दाखवणे आवश्यझक असते. वेदना कमी होण्यासाठी काही मिश्र शामक औषधे द्यावी लागतात. ज्या नर्व्हच्या भागात वेदना होतात त्या जागेला बधीर करण्यासाठी इंजेक्शयनही द्यावे लागते. इतकेही करुन वेदना थांबल्या नाहीत तर त्या नर्व्हजचे मूळ शोधून ती पूर्ण फांदीच शदाक्रिया करुन काढून टाकावी लागते. हर्पीझ हा शब्द बरेचवेळा संभोगाव्दारे होणारा संसर्गजन्यरोगासंबंधी वापरतात. पण हर्पीझ झोस्टर तसा रोग नाही. ते नर्व्हचे व्हायरल इन्फैक्शणन आहे.
उपचार
हर्पीझ झोस्टरमध्ये अतिशय वेदना होत असल्यामुळे पेशंटला संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. औषधोपचार लवकरात लवकर सुरु केला तर वेदनांचा त्रास कमी होतो आणि कॉमंप्लीकेशन्सही कमी होतात. ब्रुफेन,आयबुजेसीक,आयबुफ्लॅमार अशी वेदनाशामक औषधं देतात. दिवसातून तीनवेळा एकेक गोळी घेतली तर वेदना कमी होतात. नागीण झालेल्या जागेवर कॅलामाईन लोशन लावावे लागते. वेदना अतिशय तीव्र आणि असह्य असतील तर फोर्टविन किंवा फोर्टाजेसिकचे इंजेक्शघन द्यावे लागते.
ऍसिक्लोचव्हीर
इन्फेक्श्न अतिशय तीव्र स्वरुपाचे असेल किंवा पेशंटची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ऍसिक्लोशव्हीर हे महत्वाचे औषध द्यावे लागते. ऍसिक्लोरव्हीर (झोविरॅक्सि,हर्पेक्सद)या गोळया 200मिग्रॅ.एकावेळेस चार गोळया दिवसातून तीन वेळा घ्याव्या लागतात.या गोळयांचा कोर्स पाच दिवसांचा असतो.पण या गोळया फार महाग असतात.तरी या औषधामुळे वेदना आणि पुरळ फार लवकर नाहीशा होतात.
न्युराल्जीयासाठी
पन्नाशीच्या वयाच्या पेशंटना वायसोलोन किंवा डेल्टाकॉर्टील सारखी कॉर्टीझोन औषधे ताबडतोब द्यावी लागतात. रोज वीस ते चाळीस ग्रॅम देउन हळूहळू डोस कमी करावा लागतो. यामुळे न्युराल्जीयाला आळा बसतो. एकदा का न्युराल्जीया झाला की त्यावर इलाज करणे अतिशय कठीण असते. पेशंटला वेदना सहन कराव्या लागतात. त्या कमी व्हायला बरेच दिवस लागतात. म्हणून प्रतिबंधक उपाय आधीच करावे लागतात. हर्पीझ झोस्टरच्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज नसते. घरच्या घरी इलाज करता येतो. काही कॉम्प्लीकेशन्स झालीच तर ऍडमिट करावे लागते. एडस झालेल्या पेशंटला अतिशय तीव्र स्वरुपाची नागीण होते. किंवा नागीण हे जर एकमेव लक्षण असेल तर अशा पेशंटला एडस झाल्याची शंका घ्यायला हरकत नाही. वैद्यकीय चाचणी आवश्य क आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Nahin ha aajar Sansarg janta aahe kay..
Good knowdge given
Maza aaila heart-attack chi aushadhi chalu ahe n nagin zala tr acivir 800 5wela 15 diwas, acivir cream diwsatun 5wela lawli.. Jakham ajun purn bharlya nahi w aag khup hot ahe, chhatila pathikadun kakhetun nagin rog zala, chhatila ajunhi ghaw ahe…tadaf khup ahe kay karu??? Vitcol injections 5diwas 2 time roj dile..
Very good information.Thanks
jar nagin dolyat gelyavar kahi hani hou shakate ka?
नमस्कार.
फॅन्टॅस्टिक माहिती. टोटली इम्प्रेस्ड्.
– नेहमी नांव ऐकलेल्या रोगबद्दल आपल्याला ( म्हणजे मला स्वत:ला ) किती कमी माहिती आहे, याची जाणीव मात्र झाली.
सुभाष स. नाईक