नवीन लेखन...

नाच रे मोरा…….. ग.दि.माडगूळकर

    

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना गदिमा या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे अण्णा तर नातवंडांचे पपा आजोबा अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर…..

तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता तरंगत राहिली तसेच गदिमांनी लिहिलेले शब्द हे काळाच्या ओघात विरून न जाता प्रत्येक जणाच्या मनात अजूनही तरंगत

आहेत. पूरिया, जोगिया यासारखे काव्यसंग्रह असोत किंवा ‘या चिमण्यांनो’ ‘माझा होशिल का?’ ‘ जिंकू किंवा मरू’ यांसारखे गीतप्रकार असोत. गदिमांचे शब्द हे प्रत्येकांच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधतात. गीतरामायणाशिवाय तर कोणत्याही घरात रामजन्म साजरा होतचं नाही.

“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्‌’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.

गदिमा.कॅाम ह्या गदिमांच्या वेबसाईट मार्फत हे पुस्तक आता ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे,CCAvenue या सुरक्षित ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे क्रेडीट कार्ड अथवा नेटबॅंकींगची सुविधा वापरुन आपण हे पुस्तक घरपोच मिळवू शकता अगदी परदेशातही!.भारतात तसेच अमेरिका,इंग्लंड,यूएई या ठिकाणी हे पुस्तक आपल्या घरातील लहानग्यांसाठी भेट म्हणून देऊ शकता किंवा आपल्यातले लहान मूल परत जागवू शकता!.आजच खरेदी करा…………

— श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..