भारताच्या स्वातंत्रदिना दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१० रोजी “नाणेघाट” ला जायचे असा ट्रेक आयोजित केला. मग काय पेपर मध्ये दिलेल्या जाहिरातीमधून खूप जणांनी येण्याची तयारी दाखवली. १३ ऑगस्ट हा शेवटचा दिवस होता आणि त्या कमी वेळा मध्ये सुद्धा आम्हाला ३५ जणांची साथ लाभली. यंदाच्या ट्रेक मध्ये मी,मकरंद,सुबोध,मधुर,राकेश,आणि बाकीचे सर्व नवोदित उत्साही मंडळी होती.
सकाळी ७:३० वाजता ठाण्याच्या राम मारुती रोड वरून आमच्या गाडीने तेथून प्रस्थान केले. सुमारे ८ च्या दरम्यान मी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यापाशी त्यांना येऊन भेटलो,आणि तेथून आमचा प्रवास नानेघाटच्या दिशेने सुरु झाला. यंदाच्या ट्रेक मध्ये सर्व नवोदित मंडळी होतीच;पण सर्वात आश्चर्याची बात म्हणजे त्यात नवोदित ८ जेष्ठ नागरिक सुद्धा होते.
हि त्यांना लवकरात लवकर गाठणे होते.
नाणेघाट हा खालून खुंच सुंदर दिसत होता. मुंबई मध्ये पावसाने जोर पकडलेला होता पण इथे मात्र तो शांतच होता. पूर्ण आजूबाजूला हिरवळ पसरलेली होती,पक्ष्यांचा किलबिलाट अधून मधून एकू येत होता. तासा सव्वा तासाच्या चढाई नंतर २ व्यक्ती ह्या खूपच थकल्या होत्या. त्यांनी तर नाहीचाच पाढा सुरु केला होता. परत त्यांना खाली बसपर्यंत सोडण्यास खाली जावे लागले. पण इथे मकरंदने कामे वाटून घेतली. त्याने खाली थांबण्याचा निर्णय घेतला आणि मला वरती लवकरात लवकर जाऊन त्यांच्यात सामील होण्यास सांगितले. पंतांचा निरोप घेऊन मी वरती चढण्यास सुरुवात केली . मध्ये कुठेच नाही थांबायचे थेट त्यांना जाऊन गाठायचे असेच मनात ठरवले.
वाटेचे,मित्रांचे,फुलांचे, आणि आकाशातील ढगांचे छायाचित्र काढत असताना बरोबर स्वातंत्रदिनाच्या दिवशीच मला आकाशात भारताच्या नकाशाची प्रतिमा त्या नभात दिसली. प्रतिमा मग ती माझ्या कॅमेरामध्ये बंदिस्त केली. आता सर्व जन हे पुढे गेले होते. जेष्ठ नागरिकांमधील किशोर प्रधान हे खूपच जेष्ठ होते; त्यामुळे आम्ही त्यांना हळू हळू चढवीत होतो. कुलकर्णी काका आणि भुसावळ येथे राहणारी अनिता हिची खूप मदत मला लाभली. मात्र नंतर आम्ही अनितास वर पाठवले आणि मी व कुलकर्णी काका ह्यांनी प्रधान आजोबांना सावकाशरित्या वर चढवत होतो.
नाणेघाट हा भल्या भल्यांना थकविणारा ट्रेक आहे पहिले ३० ते ४० % पायवाट आहे आणि नंतर वेडीवाकडे वळणे आणि त्यात चढण . वाटेत लागलेल्या झर्यातून पाणी भरून घेऊन आम्ही परत चढू लागलो. आता सर्व मंडळी हे वर पोहचले होते. आम्ही अजून २० % खालीच होतो . प्रधान आजोबा ह्यांना शेवटच चढण चढण्यास कठीण जात होत आणि त्यामध्ये पावसाने जोर हि पकडला होता. पाउस आल्याने थोडा गर्व हि लाभला होता पण ज्या मार्गावरून वर जायचे होते तो आता पूर्णतः ओलसर आणि निसरडा झाला होता. पण प्रधान काकांनी १०० पैकी ९३ % मार्ग हे चढले होते. आता आपण ह्या खिंडीच्या पायथ्याशीच थांबायचे वर नाही जायचे असा निर्णय मग मी घेतला. प्रधान आजोबांच्या मनात मात्र निराशा होती .त्यांना वाटत होते कि त्यांच्यामुळे मी आणि कुलकर्णी काका हे वर जाऊ शकले नाही. ते आम्हाला बोलत सुद्धा होते कि तुम्ही दोघांनी वर जाऊन यावे,मी इथेच थांबतो येताना तुमच्याबरोबर उतरतो. पण …..दुर्ग्साखाचे नियम आणि मकरंदचे शब्द माझ्या कानात आणि डोक्यात भिनत होते. एकटे सोडून जाणे हे आमच्या दुर्गसखाच्या तत्वात बसत नाही. सुबोधला फोन करून त्यास सर्व कांही सांगितले आणि बाकीचे सर्व जन मग सुबोध,मधुर,आणि राकेश सोबत पुढे गेले. त्या सर्वांनी वर लेण्यात तर आम्ही खिंडीत आणि मकरंद आणि ” न ” चा पाढा गाणार्या त्या दोघींनी खाली बस मध्ये जेऊन घेतले. तेथेच बसून मी प्रधान काकांस नानेघाताची जेवढी माहिती आहे तेवढी देत राहिलो.
नाणेघाटाची सरंक्षक फळी हि शिवनेरी,चावंड जीवधन आणि अजून एक आहे त्याचे नाव माहित नाही या किल्ल्यांनी बनलेली आहे. नळीच्या मुखाशी एक रंजन आहे हे रंजन पूर्वी जकातीसाठी वापरला
जात असे. नाणेघाटचे सरळ चढ चढून गेल्यावर कातळात कोरलेली एक गुहा आहे त्यात ३ ते ४ पाण्याच्या टाक्या आहेत. गुहेच्या वर पहल कि प्रचंड कातळ भिंत दिसते ह्यालाच नानाचा अंगठा आसे म्हणतात . खालून ह्या भिंतीकडे पहिले तर राजमाचीचा श्रीवर्धन आठवतो. घाटमाथ्यावर वर पोहचल्यावर उजवीकडे वळलो कि नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहचतो. तेथे बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे .आणि समोर गोरख गड ,मच्छिंद्रगड, सिद्धगड तर डावीकडे माळशेज घाट, हरिश्चंद्र गड, कोकणकडा आपले अस्तित्व दाखवीत असतात. घाटावरील मोठे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट आहे. आजोबा माहिती ऐकत हि होते, आणि आमचे जेवण हि चालू होते. एक तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही परत पायथ्याच्या दिशेने पावले टाकत गेलो.चढण्यापेक्षा आता उतरताना आजोबाना खूप अवघड जात होते.पडलेल्या पावसामुळे पायवाट हि थोडी निसरडी झाली होती.आम्ही हळू हळू उतरतही होतो आणि निसर्ग सोन्दार्य हि पाहत होतो. अर्ध्या तासाच्या उतरणी नंतर आम्ही थांबलो,तो पर्यंत वरती असलेल्या मंडळीनी आम्हाला येऊन गाठले. सर्वानी आणि मध्ये मिळत असणार्या प्रत्येक वाटसरुनी प्रधान आजोबांचे कौतुक केले. त्यांच्या त्या जिद्दीला सर्वानी पाहिले होते. अता संध्याकाळ होत होती आमची मंडळी हि खाली पोहचली होती. मागे फक्त मी,प्रधान अजोबा, कुलकर्णी काका,सुबोध आणि मधुरा आम्ही पाच जन होत. खालच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागी आम्ही येऊन थांबलो. मग तेथे आम्ही आणलेली झाडे लावली. आजोबाना अजून विश्वास हि बसत नव्हता कि आपण तेवढ्या वर जाऊन आलो चेतन …..!!!!
वृक्षरोपण करून आम्ही परत खाली उतरू लागलो. पायवाट हि लागली होती आणि त्यात रात्रही होत होती. परत फोटोग्राफीच वेद माझ्या मनात भिनल आणि थोडे छायाचित्र काढून सुमारे ७:१५ च्या दरम्यान आम्ही खाली येऊन पोहचलो. सर्व जन आमची वाट बघत होते. प्रधान आजोबा आणि आम्ही येताना दिसताच सर्वानी टाळ्या वाजवून प्रधान आजोबांचे स्वागत केले.
७:३० च्या दरम्यान आम्ही तेथून निघालो आणि ९:३० च्या दरम्यान ठाण्यात येऊन पोहचलो.ठाण्यात उतरून आम्ही सर्वांचा निरोप घेतला.प्रधान आजोबांनी आमच्या दुर्गसखा ह्या संस्थेच्या लोकाना आग्रहाने त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. सर्वांनी निरोप घेतला …पण ह्या ट्रेक ला काही अडचणीमुळे न येऊ शकलेल्या अमेय आणि पूनम ह्यांनी आम्हाला भेटण्यासाठी पहिलेच हजेरी लाऊन आमची येण्याची वाट पाहता होते. परत सगळ्यांचा निरोप घेऊन मी डोंबिवलीचा रस्ता गाठला.
— चेतन राजगुरु
Leave a Reply