नवीन लेखन...

सहज-सुलभ आणि गोड अशी नारायण पेठी बोली

असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते.

मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे जसे मानले जाते तशीच नारायण पेठी या नावाची एक बोली आहे. भारतभर विखुरल्या गेलेल्या स्वकुळ साळी म्हणजेच विणकर समाजाची ‘नारायण पेठी’ ही बोली भाषा आहे.

साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा समाज अशी या स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, पैठण, येवला, नाशिक, अहमदाबाद, नवसारी, सुरत, आदोनी, बंगळुरू, हुबळी, बेळगाव, उज्जन, इंदूर अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. साहजिकच हे लोक वास्तव्यास असलेल्या राज्याची राजभाषा उत्तम प्रकारे बोलू शकतात.

आंध्र प्रदेशातील नारायण पेठ (जि. मेहबूबनगर) या गावी मोठय़ा प्रमाणावर विणकर समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. नारायण पेठी ही बोली ते आजही बोलतात. देशातील अन्य अनेक राज्यांत उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले स्वकुळ साळी समाजाचे लोक त्या त्या राज्यांमध्ये आपापल्या घरात हीच नारायण पेठी बोली बोलतात.

मात्र असे असले तरीही सध्या ही बोली बोलता येणारे काही मोजक्या ज्येष्ठ व्यक्ती उरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या अस्तानंतर ही बोली लुप्त होईल का अशी भिती या समाजाच्या लोकांच्या मनात आहेच.

नारायण पेठी बोली भाषा ही बोलायला सहज सुलभ, ऐकायला गोड आणि मवाळ अशी आहे.

हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘तेलंगणातील मराठा समाज-भाषा आणि संस्कृती’ या संशोधन प्रबंधामध्ये स्वत:ची बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणामध्ये आढळून आल्या आहेत. त्यामध्ये स्वकुळ साळी या समाजाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हातमागावर विणकाम करणे हाच व्यवसाय असल्याने हा समाज शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. या बोलीची लिपी देवनागरी आहे. मात्र तरीही या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज मिळणे थोडे दुर्मिळच आहे.

मराठी आणि नारायण पेठी बोलीतील शब्द :

माझे – माझू,
तुझे – तुझू,
काय झाले? – का झालू?,
दुखते – दुखालै,
बरे – बरू,
बघ – देक,
बोलावणे – बोलिला,
मडके – मडकू,
कोठून – कटून,
देऊळ – गुडी,
लहान – धकटू,
सतरंजी – झमकाना,
भाकरी – भक्कर

काही वाक्प्रचार :

मुलगी पसंत पडली वाङ्निश्चय झाला – पैर पसंत पडली घट्ट झालू,.
आता मला काम करण्यास जायचे आहे – आंता मज काम करास जाँवई

काही वाक्ये :

मी काम करतो – मी काम करतैय,
ही आता आली – हिने आंता आली,
तो घरी आला – तेने घरांन आला,
मी घरी गेलो – मी घरांन गेलू.

— मराठीसृष्टी टिम

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..