आपल्याला बर्या चदा आपण फक्त होकारात्मक विचारच करायला ह्वा अशी शिकवण दिलेली असते. सतत नकारात्मक विचार केल्याने आयुष्यात नकारात्मक गोष्टीच घडतात या विचारसरणीचा आपल्यावर पगडा आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे असं नाही म्ह्णता येणार पण पूर्णपणे बरोबरच आहे असंही नाही म्ह्णता येत कारण प्रेमात नकार मिळालेल्यांला आपण बर्यापचदा काय सांगत असतो की माणसाला प्रेमात नकार पचवता यायला हवा ! आपल्याला एखादी गोष्ट कोणी करायला सांगितली आणि ती गोष्ट आपल्याला करायची नसेल तर आपण नाही म्ह्णतो अथवा ती गोष्ट करायला नकार देतो. त्यात खरं म्ह्णजे आपण चुकीच म्ह्णावं असं काहीच करीत नाही. कधी – कधी काय होत एखादी गोष्ट करण्याला वारंवार नकार दिल्यानंतर एखाद्या बेसावध क्षणी आपण वैतागून ती गोष्ट करायला होकार देतो. नेमका तो होकारच आपल्या जीवनावर दुरगामी परिणाम करीत असतो.
आजच्या जगात नाही म्ह्णता येण आणि ते स्पष्ट्पणे म्ह्णता येण हे ही खूप म्हत्वाचं झालेल आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण प्रत्येकजण स्वतःला विशिष्ठ एखाद काम करण्यासाठीच तयार करीत असतो अथवा घडवू पाहत असतो त्यामुळे सहाजिकच त्याव्यतिरीक्त इतर कामे करण्यात आपण तितकेसे तयार नसतो. उदा. डॉक्टरला इंजिनिअरचे काम करता येत नाही, इंजिनिअरला शिक्षकाचे आणि शिक्षकाला आणखी कोणाचे. प्रत्येकाला आपले काम सोडून इतरांची कामे करताना त्रास तर होतोच उलट वेळही लागतो आणि कामही उत्तम होत नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांचा आणि नातेसंबंधाचा विचार करता आपण आपल्याला न झेपणारी कामे करायलाही कधी – कधी होकार देऊन बसतो आणि नंतर आपल्यालाच त्याचा त्रास होतो.
कित्येकदा आपल्याला फक्त नकार न देता आल्यामुळेच आपला बराच वेळ वाया गेलेला असतो. आपल कौशल्य चुकीच्या ठिकाणी वापरले गेलेले असते. एखाद्या मोठया चित्रकाराला एखाद्या शाळेत शिकणार्याय मुलाने त्याच्यासाठी त्याच्या चित्रकलेच्या वहीत चित्र काढायला सांगितल्यावर त्याने नकार दिला नाही तरी मनातल्या मनात त्याला त्याचा त्रास होतच असतो. आता माझे लेख वर्तमानपत्रात प्रकाशित होतात म्ह्णून आजूबाजूला राहणारी शाळेत जाणारी मुलं बाईंनी निबंध लिहायला सांगितला की निबंध लिहून घ्यायला माझ्याकडे यायचे मग मला त्यांच्या पातळीवर उतरून निबंध लिहावा लागत असे त्याचा मला खूप त्रास व्हायचा. त्यातून सुटका म्ह्णून कालांतराने त्यांचे निबंध लिहण्याची मी टाळू लागलो आणि आता तर स्पष्टच नकार देऊ लागलोय. पूर्चे मला बर्या च कला औगत असल्यामुळे छोटी-मोठी कामे करून घेण्यासाठी लोकांची माझ्याकडे रांग लागत असे. मी आनंदाने त्यांची कामे करूनही द्यायचो. नंतर माझ्या लक्षात आले लोक आता मला गृहीतच धरून चाललेत, नकार द्यायचा नाही म्ह्णून बर्यामचदा आपण कित्येकांची हजारो रूपयांची कामे ही फुकटात करून देतो आणि ती करण्यासाठी प्रसंगी आपण आपला बहूमोल वेळ खर्च केलेला असतो आणि त्यात भर म्ह्णून आर्थिक नुकसानही सहन केलेले असते. समोरच्यांना आपल्याकडून कामे फुकट करून घेण्याची सवय लागते त्यांच्या त्या सवयीचा कालांतराने आपल्यालाच त्रास होऊ लागतो. विनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो. असा आपल्या आयुष्यभराची शिक्षा देणारा होकार देण्यापेक्षा वेळीच नकार देणे योग्य नाही का ? हो ! म्ह्णायला बळ लागत नाही पण नाही ! म्ह्णायला बळाचा आणि बुध्दीचा दोन्हींचा वापर करावा लागतो. म्हणूनच नाही म्हणने म्ह्णजे नकारात्मकतेला प्रोत्साहन देणे हया नकारात्मक विचाराकडे आता होकारात्मक दृष्टीने पाहणे ही काळाची गरज आहे. आता त्या गरजेकडे दुर्लक्ष करून जमणार नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply