नवीन लेखन...

ना-म्ही निराळी पोरं

जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येतयं. हे मान्य करावचं लागेल. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात तरुण पिढीला ग्लोबल होऊ पाहातेय. अगदी माझ्यासहित. उदाहरणादाखल सांगायचचं झालं तर, इयत्ता पाचवीला असताना मला सर्वप्रथम इंग्रजी हा विषय अभ्यासाला अमलात आणला गेला तर इयत्ता आठवीला नसताना सर्वप्रथम कॉम्प्युटर हाताळता आला. मी जी उदाहरणं सांगतोय ती गेल्या १० ते १२ वर्षांपूर्वीची आहेत. म्हणजे, एका दशकापुर्वी जेव्हा इंग्रजी भाषा आणि संगणक या ग्लोबल घटकांची नांदी होऊ लागली. तेव्हा अमेरिकासारख्या प्रगत तंत्रज्ञशाही देशातील पोरं ग्लोबलायझेशनच्या पाचव्या पायरीवर असतील यात शंका नाही. संगणक, इंटरनेट या आणि यांसारखे अनेक घटक जेव्हा अमेरिकेत मशागत होऊन निर्माण होऊ लागले आणि देशोदेशी फोफावु लागले तेव्हा कदाचित आमच्या इथल्या काही अपवादींना हा चंगळवाद वाटु लागला. “पोरं ग्लोबल होऊ पहाता येत” या वाक्याचा सरळ अर्थ त्यांनी पोक्तपणा नाकारता असा होतो. “अर्न अॅन्ड लर्न” “कमवा आणि शिका” ही अद्वैत व्याख्या जेव्हा पाश्चात्य देशातील पोरांनी खर्‍या अर्थाने स्विकारली तिथे भारत सरकारने मोफत देऊ केलेल्या शिक्षणाचा किती टक्के पोरांनी फायदा करुन घेतला. इटालियन्सची निर्मिती आमच्या कडेही होते पण, पाश्चात्य देशात आधी निर्माण होतं मग आम्ही स्विकारतो. असं का होतं हा प्रश्न सतत मनाला भेडसावतो. परदेशात झाडांचे बोन्साय होतात आणि त्यांना गुटगुटीत, आकर्षक फळं येतात. आमच्याकडे पोरांचे बोन्साय केले जातात आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळवण्याचे प्रयत्न केले जातात. आम्ही भौतिक जगाशी स्पर्धा करु पहातोय हे जरी खरं असलं तरी त्यात सातत्य न चिकाटीने लढणारे फअर कमी आहेत. म्हटलं तर जगाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आज भारतासारख्या विकसित देशात आहे जगावर अधिराज्य गाजवण्याचे सामर्थ्य भारताकडे आहेत. भारत ही जगातील महासत्ता होण्याचं स्वप्न आज भारतातील प्रत्येकजण उराशी बाळगून आहे. येत्या काही काळात भारत महासत्ता होणारच आणि ही शक्यता नाकारता येत नाही. पण, त्यासाठी लागणारी क्रांती ज्या आधुनिक, ग्लोबल मुलांकडून होणे अपेक्षित आहे त्यांना पुरेसं स्वावलंबत्व देण्याची गरज, त्यांच्यात जागतिक दर्जाचे सकारात्मक विचार रुजविण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे. भारतातील संस्कार श्रेष्ठ दर्जाचे असल्याचं कारण हेच आहे की, आमच्या इथली पोरं आई वडिलांना बंदुकीची गोळी झाडून ठार मारत नाहीत. संस्कारांचा पगडा, संस्कारांची पकड घट्ट असणं म्हणजे विकास झाला असं होत नाही उलट त्याच संस्कारांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातुन कसा वापर करता याईल आणि खर्‍या अर्थाने विकास होईल हे पाहण्याचीच नव्हे तर कृतीत आणण्याची गरज आहे. आज १४३ किंवा १४३४४४ म्हणजेच “आय लव्ह यू” “आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच” या संज्ञा आजची ग्लोबल पोरं वापरत असतील ती त्यांची भौतिक किंवा आंतरिक गरज असेल पण, कॉम्प्युटर आणि इंटरनेटची ओळख करुन देण्यासाठी १९९९ मध्ये पेर ख्रिस्तनसनने सुरु केलेली “शार्पन्ड डॉट नेट” ही वेबसाईट आज आकराव्या वर्षात पदार्पण करतेय शिवाय xhtml, x86, cmos यांसारख्या कॉम्प्युटर आणि इंटरनेटशी संबंधित असलेल्या संज्ञांसाठी www.techterm.com ही वेबसाईट तर चॅटिंगमध्ये सर्रास वापरल्या जाणार्‍या शब्दांची उकल करुन सांगणारी www.chatslang.com ही वेबसाईट असेल या आणि यांसारख्या अनेक वेबसाईट आज “शार्पन्ड डॉट नेट ला जोडल्या गेल्या. या माहितीचा आवाका पाहिला तर आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडले असतील. अरे, दोस्तहो आपल्याला असेच प्रश्न पडावेत म्हणुनच ही माहिती दिली. प्रश्न ह्यांनाच पडतात जे विचार करु शकतात. विचारक्षमताच नाहीशी झाली तर साचलेपण निर्माण होते हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे.

आज आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषा बोलतो आपल्या भाषेतील साहित्य वाचतो, तसा साहित्याचा आवाका फार मोठा आहे. पण, जी भाषा आपण बोलतो, त्या भाषेवरील ज्ञानाच्या परिघावरच आपण उभे आहोत असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये. पण, भाषा समृद्ध करण्याचं, भाषेचा विकास, प्रचार, प्रसार करण्याचं, आणि मराठी भाषेला जागतिक स्तरावर ग्लॅमर मिळवुन देण्याची जबाबदारी आपली आहे ते आपलं परमकर्तव्य आहे. प्रचंड ऊर्जा आहे त्याचं योग्य नियोजन करणं आपल्या हातात आहे. व्यसन गरज होऊ नये हा प्रत्येकाचाच प्रामाणिक प्रयत्न व्हावा असा विश्वास आहे. शेवटी जाता जाता एकच म्हणेल का

सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ?

असं म्हणणारी आजची पिढी सांस्कृतिक गरज म्हणून हे गाणं कदाचित म्हणेल, पण, पाऊसाने केव्हा व कधी पडायचं हे ही ठरविण्याची क्षमता आजच्या ग्लोबल पोरांमध्ये आहे. ती क्षमता ओळखण्याची जबाबदारी आजच्या पालकांवर आहे. ती क्षमता आपण नक्की ओळखाल अशी अपेक्षा आहे अणि म्हणुनच अपेक्षांचं ओझं न वाहता ओझं हीन अपेक्षा पूर्ण करणार्‍या ग्लोबल पोरांना ग्लोबल शुभेच्छा ! !

— प्रकाश प्रभाकर बोरडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..