आमच्या चालीमधला बाबू दहावी पास झाला अतिशय उत्तम मार्क पडले ७५%. मग म्हटलं चला पेढे खाण्याची नामी संधी चालून आलेली आहे का सोडावी म्हणून स्वतः त्यांच्या घरी गेलो. पण त्यांच्या घरी सगळ्यांचे चेहरे पडलेले अरे म्हटलं कोणी …….. कि काय ?
अहो काय झाल बाबूच्या वडिलांना मी विचारलं म्हणाले कमी मार्क पडले हो बाबुला ८०% पुढे असायला हवे होते, कपाळाला हात मारून घेतला. अहो दहावी काय घेऊन बसला खरी कसरत दहावी नंतर असते पुढे ४०% पडण्यासाठी किती कसरत करावी लागते हे CA / ICWA करणाऱ्या मुलांना विचारा. उगाच दहावीच्या गुणावर जाऊ नका. पण त्यांच्या डोक्यात घुसेल तर ना. मी ठरवलं आता कोणाकडेही पेढे मागायला जायचं नाही. आणि अहो साधा चहाही न घेता मी घरी परत आलो.
तेवढ्यात शेजारचा शशी पेढे घेऊन आला आणि वडिलांसोबत. मी विचारलं काय शशी किती मार्क पडले म्हणाला ५०%. अतीशय खुश होता. मला समाधान वाटल अरे ५०% मिळून सुद्धा शशीच्या घरात सगळे खुश होते आणि तिथे आनंद देवता आपले वास्तव करीत होती.
खरोखर पुन्हा दहावीचे आपल्या मुलाचे वर्ष परत येणार आहे का ? का आपण दुखी होतो. आता पडले आहेत ना जेवढे मार्क ते काही कमी जास्त करता येणार आहेत का ? मुलाच्या बुद्दीमत्तेने त्याला ते पडलेले आहेत.
एकदा पुन्हा बारावीचा (Science ) निकाल लागला आणि बाबुला ५५% पडले आता बोला ? सुख कि दुख
आणि आपला शशी ITI करून Mechanical diplomachy तिसऱ्यावर्षालाआहे. (ITI असल्यामुळेत्याला Deplomachya दुसऱ्यावर्षाला admission घेताआले )
बाबू आणि शशी हि
काही काल्पनिक कथा नाही. अशी किती पालक मंडळी आहेत जी आपल्या मुलांना चांगली
मार्क पडली असतांना नाराज असतात ?
उद्या जर बाबुला ८०% जरी पडले असते तरी त्यांची पालक मंडळी दुखीच असतील कारण त्यांची अपेक्षा अजून वाढून ती ८५% जाईल.
— सचिन सदावर्ते
Leave a Reply