विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत.
काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून आलेला पैसा मंदिरासाठी दात देतात. तर भट-भटजी स्वत:ची तुमडी भरण्यासाठी ही सोपी संधी उपलब्ध करुन घेतात.
चंद्रसेन टिळेकरांची लेखणी समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे.
नुस्तं हसू नका !
लेखक : प्रा. चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १४०/- रुपये
पाने : १२०
Leave a Reply