प्रत्येक सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेला असा हा शब्द आहे.आणि एकदा का कोणाच्या मानगुटीवर हा शब्द बसला कि, मानमोड़ल्याशिवाय उठणं कठिण आहे.आजच्या काळात माणसाला नोकरी मिळविण्यासाठी टँलेंटची गरज नाही तर गरज आहे ती श्रीमंतीची एक बड़्याबापाचा बेटा असण्याची मग त्याला साधा अ ही काढ़ता येत नसेल तरी चालेल.जिथे तिथे जावं तिथे कोणाचा तरी वशेला दाखवावा लागतो आणि सरकारी नोकरीची तर सामान्य माणसाने अपेक्षाही करु नये.५ लाख असतील तर लगेच काम करतो असे म्हणणरे तुम्हाला पावलोपावली मिळतील.अरे ज्याच्याकड़े तुम्ही ५ लाख मागता त्याने त्याचं शिक्षण कसं घेतलंय हे त्याचं त्यालाच माहीत आणि ५ लाख रुपये जर का त्याच्याकड़े असतील तर तो असा दारोदार का फिरला असता?
इथे हे सगळं सागण्याचं कारण एकच कि,प्रत्येकाला ह्या परिस्थितीला तोंड़ द्यावं लागतं ज्याने गरिबीतुन शिक्षण घेतलंय त्याचं दुःख त्यालाच माहित.खरं तर नोकरी म्हणजे गुलामी होय.आणि आपल्या मराठी माणसाला कोणाचं गुलाम होणं पसंत नाही आणि त्याने कधी होऊ ही नये.कारण आपल्या मध्ये असणार्या कलागुणांचा वापर दुसर्याची भरभराट होण्यासाठी करणं म्हणजे नोकरी.आणि आजपर्यंत माझ्याबाबतीत नेमकं हेच घड़लय.वयाच्या १८ व्या वर्षापासुन मी नोकरी करतो आहे आणि सध्या माझं वय २५ आहे.एक सामान्य हेल्पर ते ज्युनि.आँफिसर असा माझा प्रवास आहे.पण प्रत्येक ठिकाणी मला कमी लेखलं गेलं जिथे मोठी पोस्ट मिळाली तिथे सँलरी कमी अशा काही ना काही ठोकरा मी वेळोवेळी खाल्या.आणि या परिस्थीतुन खुप काही शिकलो जे मला माझ्या पुढ़ील आयुष्यासाठी कामास येईल.
असं माझ्याबाबतीत घड़लं म्हणुन मी स्वताला कम नशिबी किंवा कमी समजत नाही माझ्यापुढ़े माझं आख्खं आयुष्य पड़लं आहे आणि ते मला सप्तसुरांतील प्रत्येक सुराप्रमाणे छान सजवायचं आहे.माझं टँलेंट
मला माहीत आहे माझी
कपँबिलीटी काय आहे आणि मी काय करु शकतो हे मला चांगलंच माहित आहे.मी अजुनही नोकरिच करतो आहे परंतु माझ्या लिखानावर माझा विश्वास आहे आणि त्या दिशेने माझे प्रयत्नही चालु आहेत.माझ्या वाचक मित्रांना मि एवढ़ंच सांगेन कि,स्वताचा टँलेंट ओळखा, योग्य दिशेने वाटचाल करा आणि स्वताचा टँलेंट स्वतासाठीच वापरा.
— प्रमोद पाटील
Leave a Reply