पंख ते आपल्याला लाभावेत एकदा गरूडाचे
स्वप्न असते हे प्रत्येक सुंदर देखण्या चिमणीचे
आकाशाच्या मिलना वेडावताच ते हृद्य चिमणीचे
स्वप्नच पडते मग तिला चंद्र झोपाळा असल्याचे
तार्यांशी लुपाछुपी करतच होते तिला खेळायचे
लुकलुकणारे डोळे त्यांचे होते पाहायचे
लाभले पंख जेंव्हा चिमणीस त्या गरूडाचे
आले लक्षात तिच्याच बळ नाही जवळ उडण्याचे
आकाशाशी कधीच होत नाही मिलन चिमणीचे
कारण नसते जीगर तिच्याकडे त्या गरूडाचे
कवी-निलेश बामणे ( एन. डी.)
— निलेश बामणे
Leave a Reply