[ccavlink]book-top#nachiket-0010#110[/ccavlink]
प्रा. विजय यंगलवार यांनी संपादित व शब्दांकित केलेले व नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले पंचगव्य औषधोपचार या माहितपूर्ण पुस्तकामध्ये पंचगव्याविषयी माहिती अक्षरश: ठासून भरलेली आहे. यामुळे हे पुस्तक फक्त वाचनीयच नाही तर संग्राह्यही झाले आहे. पुस्तकाच्या नावावरून व अनुक्रमाणिकेवरून पुस्तक हे फक्त औषधोपचाराशी संबंधित असेल असे वाटते. परंतु या पुस्तकामध्ये औषधोपचाराबरोबरच पंचगव्याच्या शेतीसाठीच्या उपयोगिते बद्दलही भरपूर माहिती आहे.
पुस्तक एकंदर सात प्रकरणे व तीन परिशिष्टात विभागले आहे. पहिल्याच गोषडंग व पंचगव्य या प्रकरणाची सुरूवात गोमातेच्या गुणवर्णनापासून झाली आहे. वेदांपासूनचे गाई बद्दलचे अनेक संदर्भ सांगत लेखकाने पंचगव्य म्हणजे काय व गोषडंग म्हणजे काय याचे वर्णन केले आहे. पंचगव्य हा शब्द आपल्या परिचयाचा आहे परंतु गोषडंग हा शब्द कुठून आला? जर लेखकाने सांगितले असते तर बरे झाले असते. गोरोचनाबद्दलची माहिती उपयुक्त आहे.
दुसरे प्रकरण पंचगव्य आणि आयुर्वेद चिकित्सा असे आहे. आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धान्त, पंचमहाभूते, त्रिदोष यांचाही उल्लेख लेखकाने केला आहे. औषधोपचाराचे सर्व वर्णन आयुर्वेदीय परिभाषेला धरून परंतु जनसामान्यांना समजेल अशा भाषेत लेखकाने केले आहे. हे अतिशय स्तुत्य आहे. पंचगव्य बनविण्याची कृती व पंचगव्यातील द्रव्यांचे एकमेकांशी असलेले नेमके प्रमाण आधुनिक मोजमापाच्या परिभाषेत दिल्यामुळे पुढील सर्व विषय फारच सोपा झाला आहे. गाय जरी गोमाता असली तरीही तिचेही खाणेपिणे पूर्वीसारखे सकस व सात्विक राहिलेले नाही. त्यामुळे पंचगव्य वापरताना कोणती दक्षता घ्यावी याच्याही सूचना ग्रंथकाराने देऊन ठेवल्या आहेत. त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत
ोहोचणे अति आवश्यक आहे. पंचगव्यांच्या द्रव्यांची एक उपयुक्त तालिकाही ग्रंथकाराने पृष्ठ क्र. 15 वर दिली आहे. थोडे मुद्रण दोष सोडल्यास ती तालिका अतिशय उपयुक्त आहे. पंचगव्याचा पीक वाढीसाठी व अन्य शेतीच्या कामासाठी काय उपयोग होतो, याचेही वर्णन या प्रकरणात आहे. पंचगव्याची आधुनिक विज्ञानाला अनुसरून असणारी माहितीही या प्रकरणात आहे.
तिसर्या प्रकरणामध्ये गोदूध आणि आयुर्वेद चिकित्सा यांचा उहापोह लेखकाने केला आहे. गाईच्या दुधाचे वर्णन व त्या विषयीची माहिती लेखकाने पुरेशा प्रमाणात दिली आहे, सैनिकांच्या घोड्यांना गाईचे दूध पाजले जात असे ही माहिती नवीन वाटली. तसेच सहा महिने गो सेवा करीत फक्त गोदुधाचे प्राशन केल्यास समाधी लागते, ही माहिती देखील नवीन वाटली. आधुनिक विज्ञानाशी निगडित माहिती सांगताना लेखकाने त्या त्या गोष्टींची लघुरूपे लिहिल्याने काही ठिकाणी अर्थबोध होत नाही उदा. दुधातील सी.एल.ए.घटक इ. आयुर्वेदानुसार दूध सिद्ध करणे, दुधाचे कुपथ्य, दूध केंव्हा कसे व कोणी वापरावे याविषयीची माहिती या प्रकरणात आली आहे. विशेषत: फळे व दुधाचा एकत्र वापर करू नये असे ग्रंथकार म्हणतो ते आयुर्वेदाला धरूनच आहे. गाईचे दूध वापरून तयार केलेली औषधे व शेतीसाठी दुधाचा उपयोग याचेही वर्णन लेखकाने केले आहे.
चौथ्या प्रकरणाचे नाव आहे. गोदही. आयुर्वेद चिकित्सा, यामध्ये दह्याचे गुणधर्म, दही केंव्हा टाळावे, ते कसे आणि केंव्हा वापरावे आणि त्याचे उपयोग थोडक्यात सांगीतले आहेत. दही हे आयुर्वेदाने अभिव्यंदी म्हणजे स्त्राव वाढविणारे व स्त्रोतसांचा अवरोध करणारे मानले आहे. त्यामुळे दह्याचा उपयोग केंव्हा टाळावा हे समजणे जास्त महत्वाचे आहे. रात्री दही खाऊ नये हा नियम साधारणत: आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु दह्या मध्ये मीठ अथवा मिरे अथवा साखर मिसळल्याशिवाय दही खाऊ नये असेही आयुर्वेद म्हणतो. वर्षा, वसंत व शरद ऋतूमध्ये दही खाऊ नये असेही आयुर्वेद म्हणतो. याच प्रकरणात काही संदर्भ तक्राचेही आले आहेत परंतु तक्रावर स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल इतकी माहिती उपलब्ध आहे.
गोतूप आयुर्वेद चिकित्सा असे पाचव्या प्रकरणाचे नाव आहे. यामध्ये अन्य प्रकरणांप्रमाणेच गाईच्या तुपाचे गुणधर्म, सिद्ध धृत तयार करण्याची पद्धती, तुपाचे उपयोग, तूप केव्हा टाळावे याची माहिती औषधी तुपांची वर्णने इत्यादीचे वर्णन आले आहे. शेतीच्या बियाणांच्या देखरेखीसाठी तुपाचा उपयोग कसा करावा याचेही वर्णन लेखकाने केले आहे. यज्ञामध्ये तांदळा बरोबर गाईचे तूप का वापरतात व त्याची आहुती दिल्याने पाऊस का पडतो याचे थोडक्यात पण वैज्ञानिक विवेचन लेखकाने केले आहे.
सहावे प्रकरण गोमुत्रावर आहे. गोमूत्र आणि आयुर्वेद यावर वैद्यवर्गाचे इतके अनुभव उपलब्ध आहेत व इतके संशोधन झाले आहे की या विषयावर देखील स्वतंत्र पुस्तक निर्माण होऊ शकेल. गोमूत्राचा अर्क बाजारात औषध म्हणून सहज उपलब्ध असल्याने ताज्या गोमूत्रा ऐवजी गोमूत्र अर्क वापरण्याची पद्धत सध्या रूढ झाली आहे. गोमूत्राचे अनेक उपयोग असले तरी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोमूत्र सेवन करूनये. गंभीर रोगांमध्ये गोमूत्र अर्क वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वापरणे अपेक्षित आहे. लेखकाने गोमूत्रावरील संशोधन थोडक्यात परंतु रोचक पद्धतीने मांडले आहे.
सातवे व शेवटचे प्रकरण गोशेण आणि आयुर्वेद असे आहे यामध्ये मुख्यत: गोशेणाच्या शेतीतील उपयोगावर जास्त भर दिला आहे. बायोगॅस पासून तर औषधी उपयोगापर्यंत मनुष्यजीवनाशीं संबंधित अनेक गोष्टी व गोशेण याचा संबंध लेखकाने विस्ताराने मांडला आहे. शेवटली तीन परिशिष्टेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या परिशिष्टामध्ये आयुर्वेदातील अनेक शब्दांच्या परिभाषा दिलेल्या आहे
तर दुसर्या परिशिष्टात पंचगव्य औषधींची तालिका आहे. तिसरे परिशिष्ट रोग आणि पंचगव्य या स्वरूपाचे आहे. यावरून लेखकाचा व्यासंग लक्षात येतो.
पंचगव्य औषधोपचार :
विजय यंगलवार
नचिकेत प्रकाशन
पाने : 80
किंमत : 80 रू.
[ccavlink]book-bot#nachiket-0010#110[/ccavlink]
— श्री.अनिल रा. सांबरे
Leave a Reply