नवीन लेखन...

पडत्या फळाची आज्ञा

वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत. मग भले ते दस्तुरखुद्द आईन्स्टाईन महाराजांनी किंवा न्यूटनसरांनी केलेलं असो. ते त्याचा पडताळा घेतल्याशिवाय मान डोलावणार नाहीत. म्हणजे न्यूटनगुरू म्हणाले की या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षण आहे. तर हे म्हणणार कशावरून? ते तसं असेल तर त्याची प्रचिती सर्वांनाच यायला हवी. शिवाय असं ते असेल तर त्याचे कोणकोणते परिणाम संभवतात? नसेल तर काय होईल? असे नुसते प्रश्न करून ते स्वस्थ बसत नाहीत . तर त्यांची उत्तरं शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेळ पडल्यास काही प्रयोगही करतात. त्यांचे निष्कर्ष पूर्वग्रहविरहित नजरेनं तपासतात. ते अनमानधपक्यानं, बोलाफुलाला गाठ पडली अशा रीतीनं तर उपस्थित झालेले नाहीत ना याची खात्री करून घेतात. मगच त्या विधानाला मान्यता देतात. केवळ न्यूटनमहाशयांच्या मस्तकावर सफरचंद पडलं म्हणून सर्वत्र गुरुत्वाकर्षण आहे असं नाही. कारण तुमच्या आमच्या डोक्यावरही झाडावरचं पिकलेलं फळ पडतं. सफरचंद नसेल तर बोर तरी पडतंच. नारळाच्या झाडाच्या सावलीत बसला असाल तर भला मोठा नारळ पडून कपाळमोक्षही होतो. हातात धरलेला कप सोडलात तर तो आहे तिथंच बस्तान मांडून बसून न राहता जमिनीवर आदळून त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडतात. त्यापायी मग शिव्याही खाव्या लागतात. लहान असलात तर आईच्या हातचे धपाटेही खावे लागतात. दुकानात असलात तर त्या कपाची किंमत भरून द्यावी लागते. आणि इतका कसा वेंधळेपणा म्हणते मी हे बायकोचे चार बोलही सर्वांच्या समक्ष ऐकावे लागतात. असा सर्वत्र पडताळा येतो म्हणून मग न्यूटनचा आपण उदोउदो करतो. असे चिकित्सक नजरेनं प्रश्न विचारून खातरजमा करून घेणं, तर्कसंगत विश्लेषण करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..