नवीन लेखन...

पर्जन्य चक्र

 [ccavlink]book-top#nachiket-0011#190[/ccavlink]

नचिकेत प्रकाशनचे प्रा. उमा पालकर या विद्वान प्राध्यापिकेने लिहिलेले “पर्जन्य चक्र” पुस्तक अतिशय वाचनीय आहे. अभ्यासपूर्ण आहे परंतु कुठेही किचकट, रटाळ झालेले नाही.

पर्जन्य, हवामान, मेघ, वादळे यांची शास्त्रोक्त माहिती अतिशय रोचक भाषेत दिली आहे. सामान्यांना या सगळ्या विषयांची माहिती होते आणि अभ्यासू लोकांना देखील हे पुस्तक आपले वाटते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

उत्तम आणि सोप्या आकृत्या, विषयाचे सहज विवेचन, एखादा कठीण मुद्दा रंजकतेची जोड देऊन सोपा करून सांगणे, यामुळे पुस्तक वाचताना उत्सुकता कायम राहते. हवामान म्हणजे काय ते कळले मग याचा अंदाज कसा घेत असतील? हवामानाचा अंदाज चुकतो का? असे प्रश्न मनात येत असतानाच अगदी आपसूक त्या माहितीपाशी येतो. मेघ कसे तयार होतात? हवेचा महासागर म्हणजे नेमके काय? या महासागराला भरती येते का? वीज म्हणजे काय? मेघांना, वादळांना नावे कशी देतात? वादळाची तीव्रता कशी मोजतात? टोर्नाडो म्हणजे नेमके काय आणि त्या वर चित्रपट कसे निघाले? त्यात दाखवलेले शास्त्रीय दृष्ट्या खरे होते का? असे सामान्य वाचकांना कायम कुतूहल असणारे विषय उत्तम रीत्या या पुस्तकाने मांडले आहेत. या शिवाय सूर्य मालेतील इतर ग्रहांवर येणारी वादळे, मेघ, तिथले हवामान यांचाही आढावा यात घेण्यात आला आहे.

प्रा. उमा पालकर यांना 38 वर्षांचा शिकवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर करण्याचा अनुभव आहे. त्यांनी व्याख्यानेही दिली आहेत. पुस्तक वाचताना या सगळ्याचा फायदा वाचकाला होतो. सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी आणि तरीही नवीन आश्चर्यकारक काहीतरी मांडण्याची शैली वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवते आणि त्या मुळेच क्लिष्ट विषयावरील हे पुस्तक असूनही कुठेही त्याचे रूपांतर “पाठ्य” पुस्तकात होत नाही ! मान्सून हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय! त्यांचे जीवनच त्यावर अवलंबून. त्यामुळेच पर्जन्य चक्रात त्याचा प्रामुख्याने उहापोह होणे अर्थातच अपेक्षित होते. आणि प्रा. पालकर यांनी या विषयाला पूर्ण न्याय दिला आहे. मान्सूनची सगळी माहिती यात आहे. त्यामुळे आता पाऊस पळाला, पाऊस अति झाला, अशा बातम्या आल्या की त्यामागील नेमके विज्ञान आपल्याला कळू शकणार आहे. हवामान बदल आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम यांचाही परामर्श यात चांगला घेण्यात आला आहे.

हे सगळे लिहिताना त्या त्या विषयाशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींचा उल्लेख यात आला असल्याने इतिहास आणि वर्तमान घडामोडीशी आपण जोडले जातो.

नचिकेत प्रकाशन अभ्यासपूर्ण विषय सामान्यांना रोचक वाटेल अशा भाषेत पुस्तक काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पुस्तकही या परंपरेत मानाचा तुरा खोवणारे झाले आहे. उत्तम छपाई , फार भपका नाही परंतु दर्जात कुठेही तडजोड नाही या मुळे वाचनाचा आनंद वाढतो. मुद्रा राक्षसाचे प्रताप आहेत पण अगदीच थोडे आणि सहज दुर्लक्ष करता येण्याजोगे !शेती, पाऊस, वादळे यामुळे सतत आपल्या आयुष्यात बदल होत असतात. महागाई वाढते तर कधी सगळे आलबेल असते. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असलेला हा विषय घरातील प्रत्येकानं माहीत करून घ्यावा, असा अनिवार्य आहे. चटपटीत रेसिपीज वाचणार्‍यांनी तर अधिक आवर्जून वाचावे, कारण मेघ आहेत तर शेती आहे आणि जिभेचे चोचले आहेत!!

एका चांगल्या विषयाची उत्तम मांडणी झाली की पुस्तक वाचनीय होते हे या निम्मिताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले!

“पर्जन्य चक्र” (मेघ, वीज , वादळवारा आणि पाऊस.)
पाने : 166, किंमत : 170 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

[ccavlink]book-bot#nachiket-0011#190[/ccavlink]

— श्री.अनिल रा. सांबरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..