८५ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्याय वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. “अयोध्येचा राजा” या चित्रपटाने मा. दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस ‘प्रभात फ़िल्म ‘ चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.
http://www.prabhatfilm.com/home.htm
अयोध्येचा राजा
१९३२
पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३१४२ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११०६०/ ६-२-३२
निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना. वि. कुलकर्णी
संवाद :ना. वि. कुलकर्णी
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल
वेषभूषा :एच्.एस्.काकडे
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :कुमार दिगंबर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, मा. विनायक, मानाजीराव माने, शंकरराव भोसले
गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply