आज १८ आक्टोबर
आज पहिल्या महिला नाटककार मा.हिराबाई पेडणेकर यांची जयंती.
जन्म:- २२ नोव्हेंबर १८८५
मा.हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी वगळता बंगाली, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचाही अभ्यास हिराबाई यांनी केला. हिराबाई या चांगल्या गायिका होत्या. त्यांना गायनकला आणि नृत्यकला अवगत होती. हिराबाई यांच्या प्रतिभेमुळे तत्कालीन अनेक आघाडीच्या नाटककारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. हिराबाई या कविता लिहीत. त्यांच्या कविता तेव्हाच्या आघाडीच्या मराठी साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. दरम्यान त्यांची “माझे आत्मचरित्र” ही लघुकथा प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. त्यांच पाहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसर नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या. सुनिता देशपांडे यांच्या लेखानानुसार तत्कालीन संगीत नाटकसृष्टीवर हिराबाई यांचा मोठा प्रभाव होता. त्या पुढे लिहीतात की कोल्हटकर आणि गडकरी यांनी वेळोवेळी नाटक संगीतबद्ध करताना हिराबाई यांची मदत घेतली. हिराबाई यांचा एवढा प्रभाव वाढला होता की एका नाटककाराने त्यांच्या जीवनाला समोर ठेऊन नाटक लिहीले आणि नायिकेचे पात्र उभे केले. हिराबाई यांच्या संगीत नाटकातील योगदानाची दखल फारशी घेतली गेली नाही. मा.हिराबाई पेडणेकर यांचे निधन १८ आक्टोबर १९५१ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.हिराबाई पेडणेकरयांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
Leave a Reply