भाग-१ – जम्मू- काश्मिरमध्ये सुरक्षा दलाच्या आक्रमक हालचाली
सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सुरक्षादल व आतिरेकी यांच्यात मार्च महिन्यात झालेल्या चकमकींवरून ही घुसखोरी बर्फ वितळण्याच्या आधीच सुरु झाल्याने ती नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध होते. २००८ च्या तुलनेत घुसखोरीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. शिवाय छोट्या गटांपेक्षा २०-३० सशस्त्र व सुसज्ज अतिरेकी एकाच वेळी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सैन्यदलाची आक्रमक कृती
मागील नोव्हेंबर-डिसेंबर मधील निवडणूकांपासून सैन्यदलाने स्थानिक पातळीवर घडवून आणलेल्या सुधारणा कायम राखण्यास सैन्यदलाला यश आले. असे असले तरी सैन्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून त्या विरोधात शहरी भागात चळवळी, आंदोलने करण्यात आली. हुरियत कॉन्फरन्सही नागरिकांना निवडणूकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील केला.
लेखकः (निवृत्त) ब्रिगेडीयर श्री.हेमंत महाजन
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply