नवीन लेखन...

पाताळ मोहीम



चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल (म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि

सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या लढ्याची ही रंजक कथा.काही वर्षांपूवीं हरियाणात एक मूल नलिका कूपात पडले होते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचा तसेच सुरक्षा दलाच्या जवानांचा 48 तास आटापिटा चालला होता. या कामाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर सुरू होते आणि सारा देश श्वास रोखून हे प्रक्षेपण पहात होता. सारा देश एक झाला होता. ते मूल त्या विवराच्या बाहेर आले आणि देशातल्या शंभर कोटी लोकांनी जणू काही आपणच त्या पाताळातल्या अटकेतून सुटलो आहोत अशा भावनेने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या दिवशी संसदेचे अधिवेशन सुरू होते. ते मूल जिवंतपणे बाहेर आले आहे असे कळताच सार्‍या संसदेने त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. ते सारे वातावरण आठवून पहा. एका बालकासाठी आणि एका दिवसासाठी ते निर्माण झाले होते.

चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल( म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. मग त्या देशात त्यांच्या सुटकेबाबत किती उत्कंठा दाटून आली असेल याचा अंदाजही करता येत नाही. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. आत अडकलेले सारे खाण कामगार चीलीतले होते पण त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेला संघर्ष हा निसर्ग विरुद्ध चीली नव्हे तर निसर्ग विरुद्ध सारी मानवी जात असा चालला होता. मानवाने अशा बचाव

कार्याचे आव्हान पेलता यावे अशी यंत्रे शोधून काढली आहेत आणि तो आता प्रगत झाला आहे या दाव्याची अक्षरश: सत्त्वपरीक्षा सुरू होती. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि 33 कामगार सुखरूप बाहेर आले. त्या कामगारांच्या सुटकेची प्राण कंठाशी आणून वाट पाहणार्‍या त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सुहृदांना किती आनंद झाला असेल याची कल्पना ती दृष्ये प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय येणार नाही. या कामगारांचा हा जगण्या मरण्याचा झगडा 69 दिवस सुरू होता तरीही त्यातले पहिले 17 दिवस त्यांना आपण नेमके कोठे आहोत याचा काही पत्ता नव्हता. ते तर आपण कधी तरी मरणार असेच गृहित धरून त्या पाताळातल्या अंधारकोठडीत मृत्युच्या घटकेची वाट पहात होते. अन्न नाही, पाणी नाही, संपर्क नाही अशी अवस्था होती. सार्‍या देशाने त्यांच्या सुटकेची आशा सोडलेली होती आणि आता त्यांचे मृतदेह कसे आणि कधी बाहेर येतील याचीच तेवढी दुर्दैवी उत्सुकता त्यांना लागून राहिली होती. पण २४ ऑगस्टला त्यांचा ठाव ठिकाणा समजला आणि त्यांचा संपर्क प्रस्थापित झाला. चीलीचे अध्यक्ष सेबॅस्टीन पायनेरा यांनी कोणत्याही स्थितीत या 32 चीली आणि एकमेव बोलिव्हीयन कामगारांना बाहे
काढायचेच असा निर्धार केला आणि सार्‍या देशवासीयांच्या सदिच्छा पाठीशी घेऊन ते कामाला लागले. या साठी कठीण आणि टणक खडक खोदत 2 हजार फूट खोल जावे लागणार होते. त्यांनी या कामी अमेरिका(पेनसेल्वानिया) आणि जर्मनीतली खोदाई यंत्रे कामाला लावण्यात आली. कॅनडाच्या वॉटर्लू विद्यापीठातले प्राध्यापक एम. बी. डुसॉल्ट यांनी या बचाव कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतले होते. आत अडकलेले कामगार किती तरी अवघड अशा हवामानात रहात होते. एवढ्या खोलवर त्यांना किती तरी जादा तापमानाला तोंड द्यावे लागत होते. त्यांना ते सहन व्हावे यासाठी काही साधने पुरवण्यात आली होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ नये यासाठी ऑक्सीजन पुरवण्यात आला होता आणि अवकाश प्रवाशांना देतात तसे पातळ अन्न पुरवले जात होते. ते लोक आतल्या परिस्थितीने मरू नयेत याची काळजी घेणे शक्य होत होते ही ही विज्ञानाची किमयाच होती. पण आता कसोटी होती ती त्यांना बाहेर काढण्याची. सुरूवातीला खोदकाम करीत खाली जाणे आणि एखाद्या खाण कामगाराला बाहेर काढण्यात यावे असे ठरले तेव्हा हे काम कितीही मोठी यंत्रे आणून करायचे ठरवले तरीही त्या पातळीला पोचण्यास आणि पहिला कामगार बाहेर पडण्यास किमान चार महिने लागतील असे वाटले होते. सर्वात कठीण काम म्हणजे हे काम करण्याच्या तीन पर्यायी पद्धती दिसत होत्या. तेव्हा ए, बी आणि सी अशी तीन नावे देऊन तीन पद्धतीने खोदाई सुरू केली. या कामाला अपेक्षेप्रमाणे चार महिने काही लागले नाहीत पण सात आठवड्यात ते यशस्वीपणे पूर्ण झाले. आधी ते अडकलेले कामगार नेमके कोठे आहेत याचा पत्ता लावण्यासाठी सहा इंच रुंदीची एक कॅप्सुल तयार करण्यात आली. तेवढ्या रुंदीची कूपनलिका खोदत खाली गेल्या नंतर ती कॅप्सुल त्या कामगारांपर्यंत जाऊ शकते असे लक्षात आले ती बी मार्गातली होती. पर्यायाने बी मार्गाने तिथपर
यंत जाता येते आणि हाच मार्ग त्यांना बाहेर काढू शकेल असे दिसून यायला लागले. मग त्याच मार्गावर आधी 12 इंच रुंदीची आणि नंतर 24 इंच रुंदीचे खोदकाम करून त्या विवरांतून फिनिक्स नावाचा पाळणा खाली पाठवण्यात आला. ज्यातून हे सारे कामगार सुखरूप बाहेर आले. अर्थात हे अपेक्षेपेक्षा कमी वेळात बाहेर आले असले तरीही ते काम अपेक्षेइतके सोपे झाले नाही. खोदकाम करता करता खोदाई करणारी यंत्रे आडव्या येणार्‍या काही लोखंडी

वस्तूंना अडकत गेली आणि पूर्ण खोदकाम थांबवून दुसर्‍या मार्गाने करावे लागले. असे वळण रस्त्यांनी त्याच ठिकाणी जाण्याची कसरत

करीत करीत तिथपर्यंत पाळणा सोडण्यात यश आले आणि या खाण कामगारांचा 69 दिवसांचा हा जिवंत पाताळवास संपला. खोदाई करीत करीत खाली जाणार्‍यांच्या अचुक काम करण्याच्या पद्धतीचा जसा प्रत्यय आला तसाच आत फसलेल्या कामगारांनीही अतिशय शिस्तीने वागून आणि मदत करणार्‍यांना सहकार्य करून आपल्याही धैर्याचे अभिमानास्पद दर्शन घडवले.(अद्वैत फीचर्स)

— मनोज मनोहर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..