नवीन लेखन...

पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का?
याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, पचन सुधारते असे काही संशोधनांचे निष्कर्ष आहेत. ज्या देशांत सकाळी नाश्त्यापासूनच मांसाहार करण्यास सुरुवात होते तेथे आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण मुळातच जास्त असणार ही बाब आपण लक्षातच घेत नाही. आपल्याकडे ‘पट्टीचे खाणारे’ लोकही नाश्त्यापासून मांसाहारावर ताव मारायला सुरुवात करत नाहीत हे महत्वाचे. ‘पचन सुधारणे’ म्हणजे केवळ शौचाला साफ होणे इतकाच अर्थ अशा संशोधनांत आढळून येतो. प्रत्यक्षात इतका संकुचित अर्थ वैद्यकीयदृष्ट्या मुळीच योग्य नाही. दिवसभर ब्रेड, चीज आणि मांस यांसारखे पचायला अतिशय जड पदार्थ सातत्याने खाल्ल्यावर स्वाभाविकपणे निर्माण होणारा बद्धकोष्ठाचा त्रास टाळावा म्हणून हे लोक Fibre आणि roughage इतक्याच मर्यादित दृष्टिकोनातून या पालेभाज्यांकडे पाहून त्यांचा उदोउदो करत असतात. आपल्याकडे तसा करण्याची निश्चितपणे आवश्यता नाही.
परदेशात खाल्ल्या जाणाऱ्या कोर्नड, सॅलरी, रॉकेट लिव्स यांसारख्या Green leafy vegetables या आपल्याकडच्या मेथी, चाकवत, माठ इत्यादी पालेभाज्यांच्या तुलनेत अगदी भिन्न आहेत. त्यामुळे त्यांना लावलेला हा न्याय आपल्याकडे मुळातच लावता येणार नाही. मुंबईसारख्या शहरांत तर रेल्वेलाईनच्या लगत असलेल्या वाफ्यांत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आणि आजूबाजूच्या सांडपाण्यावर पोसल्या जाणाऱ्या पालेभाज्यांत निकेलसारखे कर्करोगास कारणीभूत असणारे घटक वाजवीपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात आढळले आहेत. (यात पालक ही पालेभाजी आघाडीवर आहे)
सरटेशेवट; जो आहारीय पदार्थ जसा दिसतो/असतो तसेच परिणाम तो शरीरावर करतो. पालेभाज्या लवकर वाढतात, लगेच कुजतात आणि त्यात सर्वाधिक किडे असण्याची शक्यता असते. आयुर्वेदाने तर पालेभाज्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ‘अशाकभुक्’ या शब्दात दिलेला आहे. थोड्क्यात सांगायचे झाल्यास; पालेभाज्यांचा आहारात अगदी जेमतेम समावेश असावा. Green leafy vegetables चा आंधळेपणाने केलेला गवगवा तर अजिबातच नको!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..