ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात.
हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो.
चलातर मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)डोक्यात खवडे झाल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस डोक्यावर लावून २ तास ठेवावा व मग केस धुवावे.
२)हातापायांना आग होऊन जळजळ होत असेल तर अंबाडीच्या पाल्यात मीठ टाकून त्या पाण्याने वाफ द्यावी व गरम पाला हातापायांना बांधावे.
३)तेलकट पदार्थाचे अजीर्ण झाले असल्यास अंबाडीची भाजी व तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात खावा.
४)मार लागून सूज आल्यास अंबाडीच्या पानांचा पोटास रूईच्या पानात गुंडाळून बांधावे.
५)वारंवार उल्ट्या होत असल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस ४ चमचे +खडीसाखर १ चमचा+१/४ चमचा वेलचीपूड हे मिश्रण दर १/२ तासाने चाटायला द्यावे.
अंबाडीची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास एॅसीडीटी होते व पित्ताचे विकार होतात.
(कृपया हा फोटो चुकिचा असल्यास कळवावे व ख-या भाजीचा फोटो माझ्या पर्सनल अकाऊंट वर पाठवावा हि वाचकांना नम्र विनंती आहे )
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply