ओवाच्या पानांची बेसनाचे पीठ लावून केलेला कुरकुरीत भजी चटकदार लागतात.तसा ह्याचा विशेष वापर पालेभाजी म्हणून जेवणात होत नाही.तरी देखील ह्याच्या विशिष्ट गंधामुळे व त्यात असणा-या औषधी तत्वांमुळे आजीबाईंच्या औषधी बटव्यात हिचे महत्त्वाचे स्थान आहे.
ओव्यांची पाने खण्डाकार,मऊ,लवयुक्त व जाड असतात.जणू खरेखुरे वेलवेटचेच पान?.ह्याचे १-३ फूट उंचीचे क्षूप असते.
चवीला तिखट,कडू व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील कफ व वातदोष कमी करते व पित्त वाढवते.
ह्या पानांचा उपयोग काढ्यात,पोट दुखीत रस घ्यायला करतात.तसेच ह्याचे अनेक औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:
१)संधिवातावर पानांचा रस सांध्यांना चोळावा.
२)तोंडास दुर्गंध येणे व चव नसणे ह्यात ओव्यांची पाने चावून लाळ थुंकावी.
३)खरूजेवर ओव्यांची पाने वाटून लावावी.
४)जेवणानंतर सुस्ती येणे,छातीत जडपणा वाटणे,अपचन,ह्यात ओवा पाने+कोथिंबीर +खोबरे+आले यांची चटणी जेवणात ठेवावी.
५)पोट दुखी व क्रुमी ह्यात ओव्याच्या पानांचा रस १ चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.
ओव्याची पाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्त वाढते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply