तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.
हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:
१)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.
२)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.
३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.
४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.
५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply