आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि ब-याचं मंडळीच्या आवडीची हि हिरवीगार भाजी.ताजी टवटवीत असताना दिसते देखील सुरेख नाही का?
आपण ह्याचे बरेच पदार्थ खाण्या करीता बनवतो.पालक पनीर तर ब-याच जणांच्या आवडीचे,आलूपालक,पालकाची भजी,पालकाचे सूप,पालकाची शेव इ.
पण हाच पालक काही आजारांमध्ये आपण घरचा वैद्य म्हणून देखील वापरू शकतो बरे का!
पालकाचे लहान हातभर उंचीचे क्षुप असते.आणी ह्याची पाने भाजीसाठी वापरतात.हा चवीला गोड,कडू व थंड असतो.त्यामुळे तो शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहूयात ना!
१)ज्या आजारांत ताप येतो जसे घसा फुलणे,फुफ्फूसांत कफ भरणे,श्वासनलिकेस सुज येणे ह्यात ह्याच्या पंचांगाचा काढा वापरतात.
२)१/४ कप पालकाच्या पंचांगाचा रस+४ चमचे ब्राम्हीचा रस+ १ चमचा साखर हे मिश्रण रोजरात्री जेवल्यावर साधारण २ १/२ तासांनी व झोपायच्या पुर्वी १/२ तास नियमीत घेतल्यास मानसिक थकवा कमी होतो व बुध्दीची धारणा शक्ती वाढते.
३)घशात जळजळ होत असल्यास पालकाच्या पानांच्या रसांच्या गुळण्या कराव्यात.
४)खोकला येऊन कफसुटत नसल्यास पालकाच्या पानांचा चहा १ कप+१ चमचा मेथी पूड+१/२ चमचा मध हे मिश्रण काही दिवस घ्यावे.
५)ज्यांना वारंवार चमचमीत खाऊन शरीरात पित्त वाढते आणी अंगाचा दाह,हातपायांची जळजळ,पोटात आग होणे अशा तक्रारी होतात त्यांनी १/४ कप पालकरस + शहाळ्याचे पाणी १/२ कप हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावे फायदा होतो.
पालकाच्या अतिवापराने युरीकअॅसीड वाढते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply