ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते.
हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते.
हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन पाने वापरू नये व हि भाजी नीट निवडूनच करावी कारण पानांच्या खाली बारीक अळ्यांचे बस्तान असण्याची दाट शक्यता असते.
चला आता हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जखम भरून येण्यास भारंगीच्या पानांचा लेप जखमेवर लावावा.
२)सर्दी खोकल्या मध्ये भारंगीची पाने+ सुंठ+ मिरी+गुळ घालून काढा करावा व प्यावा.
३)भारंगीची भाजी शिजवून त्याचे पाणी प्यायले असता पोटातील कृमिंचा नाश होतो.
४)तापामध्ये भारंगीची व गुळवेलीची पाने एकत्र शिजवून काढा करावा व तो मध घालून घ्यावा.
५)अंगाचा दाह होत असल्यास भारंगीच्या पानांची चटणी वाटून तिचा लेप तळहातावर व पायांवर करावा.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास जुलाब होतात.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अतिषय उपयुक्त माहिती