चाल : पारंपारिक (सागरा प्राण तळमळला)
पाळणा हालविते, सानुल्या माझ्या बाळा.
निज निज रे लडिवाळा.
कुशीत अभ्राच्या निजलाय चंद्र सोनुला.
तु जागसी का वेल्हाळा.
मी थकले ना झोके देता देता.
तु थांबीव असला चाळा.
अपरात्रीचा प्रहर लोटतो आहे.
का जपसी कोहं माळा.
झोपले बघ तारे सारे.
तु व्यर्थ जागा का रे.
लाव चिमण्या पापण्यांची द्वारे.
तुज निजवाया आला यशोदेचा गोपाळा.
निज निज रे लडिवाळा.
देशशत्रुंनी आपुले हरपले छत्र.
भरतखंडाचे दिव्य स्वातंत्र्य.
भंगिली मंदिरे, धर्मही आता बुडाला.
ना कुणी सावरे त्याला.
या दुःखाने काकूळते गं बाई.
मी रेशमाई तुझी आई.
विनायकाचे सागर उड्डाण.
रामाने मारिला रावण.
शिवबाने वधीला अफझुलखान.
तु निपजशील ना, तसाच या चांडाळा.
निज निज रे लडिवाळा.
राष्ट्रभक्तीचे बाळकडू तुज पाजीन.
शूर तुला मी बनवीन.
तु बालक ना असे सर्वसाधारण.
साक्षात कलकी अवतार.
तु होशील राजा जनकल्याण.
स्थापुनी आनंदवनभुवन.
युगपुरुषाची मी माता रे.
हा अखंड भारत होता रे.
ध्वज भगवा झुलडुलता रे.
काया ठेवीन मी, अशा सात्वीक वेळा.
निज निज रे लडिवाळा.
पाळणा हालविते, सानुल्या माझ्या बाळा.
निज निज रे लडिवाळा.
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply