भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंडविषयी (पीएफ) कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास मंडळाची अधिकृत वेबसाइट [e-link-ms]www.epfindia.com#http://www.epfindia.com[/e-link-ms] हा उत्तम मार्ग आहे. पीएफ खात्यांच्या कम्प्युटरायझेशनचे मंडळाने हाती घेतलेले काम पूर्णत्वास आल्याचा फायदा सर्वसामान्यांना यामुळे होत आहे.
पीएफ खात्यातील रक्कम, क्लेमची सद्यस्थिती, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा यांसारख्या कर्मचार्यांना आवश्यक असलेल्या नेहमीच्या गरजा या वेबसाइटवर तत्काळ पूर्ण होतात. केवळ अकाऊंट नंबर दाखल करण्याचा अवकाश, काही मिनिटांत मोबाइलवर खात्याचा पूर्ण अहवाल, पीएफ बॅलन्सचा एसएमएस येतो.
त्याचबरोबर देशभरातील पीएफ कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक, कंपनीचा पीएफ कोड शोधण्याची सुविधा यासह इतरही अनेक गोष्टी या साइटवर उपलब्ध आहेत.
[e-link-ms]www.epfindia.com#http://www.epfindia.com[/e-link-ms]
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply