नवीन लेखन...

पुलंचे काही किस्से



एकदा सुधीर गाडगीळ माणिक वर्मांची मुलाखत घेत होते. मुलाखतीदरम्यान सुधीरने माणिकताईंना त्यांचे व वर्मांचे प्रेम कसे जमले अशा आशयाचा प्रश्न विचारला.

तेव्हा पहिल्या रांगेत बसलेले पुलं मोठ्याने बोलले, “अरे सुधीर तिच्या वर्मावर नको रे बोट ठेवू!”

———————————–

आनंदवनातील एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातील नावाजलेली मंडळी सहभागी

झालेली होती. समोरच्या पंगततीत किर्लोस्कर मासिकाचे संपादक श्री. मुकुंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधूनच ते उठले आणि त्या सोहोळ्याचे फोटो काढू लागले. फोटोचे काम संपल्यावर पुन्हा आपल्या पानापाशी येऊन पाहातात तर त्यांचे पानावर दुसरीच व्यक्ती बसलेली होती.

पुलंच्या लक्षात ही गोष्ट यायला वेळ लागला नाही. ते लागलीच उद्गारले,“मुकुंदराव, इथे संपादकीय पान नाहीये.”

————————————–

एकदा एका भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला श्री. ना.ग. गोरे व दुसर्‍या बाजूला श्री. भुजंगराव कुलकर्णी बसले होते. ते पाहून पुलं उद्गारले,“ आफतच आहे. एकीकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग!”

————————————–

शरद तळवलकर हे वसंत सबनिसांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले तेव्हा पुलं तेथे बसलेले होते.

वसंतरावांनी ओळख करुन दिली,“हा माझा मित्र, शरद तळवलकर.”

पुलं म्हणाले, “हो का? अरे वा. हा चांगला मनुष्य दिसतो. नव्हे हा चांगला असणारच.”

त्यावर वसंतरावांनी पुलंना विचारले,“हे कशावरुन म्हणतोस तू?”

पलं उत्तरले,“ अरे याच्या नावावरून कळतंय ते. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार नाही म्हणजे हा माणूस सरळ असणारच!”

————————————–

त्यांच्या ओळखीच्या मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे व सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पुलं म्हणाले,“बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखले हो!”

— कालिदास वांजपे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..