नवीन लेखन...

पोटाचे एक्स-रे

सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे. तरीही पित्ताशयातील खडे, मूतखडे, मूत्रपिंडाचा आकार हे कळण्यासाठी साधा फोटो आजही सांगितला जातो व या फोटोसाठी आदल्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेऊन उपाशी पोटी सकाळी गेल्यास हा फोटो चांगला येतो. थोडे पाणी पिऊन किंवा चहा पिऊनही रुग्ण या तपासणीसाठी जाऊ शकतो. अॅपेंडिक्सच्या इमर्जन्सीमध्ये निदान करण्याच्या आधी हा फोटो अत्यंत जरुरीचा आहे कारण पोटात येणारी कळ मूतखड्यामुळे तर नाही ना हे त्वरीत समजते आणि अकारण ऑपरेशन टळते.

पोटाचा अत्यंत महत्त्वाचा एक्स-रे म्हणजे “उभा काढलेला एक्स-रे जेव्हा पोटात कळा येतात त्यावेळी अॅपेंडिक्स फुटले आहे की अल्सर फुटला आहे ते कळते. शिवाय आतड्याला पीळ पडला असेल तर तेही साध्या एक्स-रे वरुन त्वरित कळते. हा एक्स-रे रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. मूतखडा खाली घसरताना येणार्‍या कळा जीवघेण्या होतात तेव्हा एक्स-रे, के. यु.बी. हे दोन एक्स-रे काढावे लागतात. यामध्ये ओटीपोटाचा वेगळा एक्स-रे ट्यूबला अॅंगल देऊन काढावा लागतो. तरच तो स्पष्ट येतो.

पोटाच्या साध्या एक्स-रे बरोबरच बेरियम टेस्ट ही खास पोट व आतडी यासाठी करावी लागते. तसेच मोठ्या आतड्यासाठी बेरियम एनेमा हे एक्स-रे डॉक्टर काढायला सांगतात.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..