नवीन लेखन...

प्रगतीतून अधोगतीकडे

 मनुष्याच्या प्रगतीची व्याख्या काय, असा प्रश्‍न कोणाला विचारल्यास त्याचे उत्तर असेल पत्नी, तिच्यापासून होणारी मुले-मुली, त्यांच्यासाठी हवा असलेल्या पैसा, गाडी, बंगला, स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि ऐषोआरामाच्या सुख-सोयी. याहीपुढे जाऊन वैज्ञानिक, वैचारिक, प्रगती. यापेक्षा माणसाची प्रगती वेगळी काही असू शकेल, असे मला तरी वाटत नाही. या भौतिक प्रगतीत रममाण

असलेला मनुष्य आज खरोखर सुखी आहे का? हा दुसरा प्रश्‍न एखाद्याला विचारल्यास, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधून पाहे, असे रामदास स्वामींच्या भाषेतील उत्तर मिळले. मी वर उल्लेख केलेल्या भौतिक प्रगतीपेक्षा आणखी काही वेगळी प्रगती कोणाला सुचत असल्यास जरुर सांगावी. आपले स्वागतच आहे. मात्र या भौतिक प्रगतीच्या नादाला लागून मनुष्य अधोगतीकडे तर जात नाही ना? असा विचार आज करायची वेळ आली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांत राहणार्‍या मनुष्यांनी भौतिक प्रगती खरोखर केली आहे, यात शंकाच नाही. मात्र ही खरी प्रगती आहे का? मी, माझी पत्नी, मुले या संकुचित विश्‍वाच्या पलीकडे पहायला कोणाला वेह राहिलेला नाही. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात मरून पडलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर तीन तास पडून राहतो. त्याच्याकडे पहायला कोणाला वेळ नाही. तीन तासानंतर पोलिस येतात आणि पंचनामा केल्यानंतर तो मृतदेह घेऊन जातात. हीच का आपली प्रगती? आणि ही जर आपली प्रगती असेल तर असल्या दळभद्री प्रगतीचा काय जाळ करायचा का? पुण्याचे उदाहरण प्रतिनिधिक स्वरुपाचे असले तरी इतर अनेक शहरांत यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. मनुष्याने भौतिक प्रगती केली तरी अध्यात्मि प्रगतीच्या तुलनेत ती अधोगतीच आहे. अर्थात प्रगती करायचीच नाही, असा याचा अर्थ होऊ शकत नाही. मात्र ती करत असताना सामाजिक बांधिलकीतून इतरा चाही विच
र होणे आवश्यक आहे. अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलिस आणि कोर्टाचा ससेमिरा पाठीमागे लागेल, या संकुचित वृत्तीमुळे अनेक जण अपघातग्रस्तांना मदत करत नाही. अर्थात याबाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असणार यात दुमत असण्याचे कारण नाही.भौतिक प्रगतीपेक्षा अध्यात्मिक प्रगती कधीही श्रेष्ठ आहे, अशी शिकवण सनातन धर्मसंस्थापक सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांनी दिलेली आहे. याविषयी श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत, वेद-उपनिषद आदी वैदिक ग्रंथांनुसार भगवान श्रीकृष्णांचा आणि आपला यथार्थ संबंध जाणून एकमेव त्यांनाच शरण जाऊन त्यांची भक्ती करणे हीच मनुष्याची खरी प्रगती आहे. यातच खरे सुख आणि समाधान आहे. मात्र हे कसे करायचे, याविषयी अनेक तर्क-वितर्क असल्याने भगवान श्रीकृष्णांना जाणून घेण्यात मुख्य अडचण येऊ शकते. यासाठी आपण जेथे राहत असाल त्याठिकाणी इस्कॉनचे केंद्र असल्यास आपणाला याविषयी मौलिक मार्गदर्शन मिहू शकेल. आणि इस्कॉनचे केंद्र नसेल तर आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा. मी अवश्य आपणाला प्रमाणित सर्वश्रेष्ठ परंपरेशी संलग्न असलेल्या प्रामाणिक कृष्णभक्ताची भेट घालून देईल.

बाळासाहेब शेटे माझा मोबाईल-९७६७०९३९३९

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..